नांदेड(प्रतिनिधी)-फलटण येथील डॉ.संपदा मुंडे यांना न्याय मिळाला नाही म्हणून आज नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी न्याय मागणारे बोर्ड हातात घेवून शहरात जागो-जागी उभे राहत आहेत.
फलटण येथे डॉ.संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्यानंतर त्याला वेगवेगळे रंग देण्यात येत आहेत. त्यांनी चार पानांचा एक अर्ज आपल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना लिहिला होता. त्यामध्ये आपल्यावर काय-काय अत्याचार होतात, कोण-कोण करते यांची नावे आहेत. पण सातारा पोलीस अधिक्षक तुषार दोषी सांगतात तो अर्ज वेगळा आणि आत्महत्या प्रकरण वेगळे. या प्रकरणात एका पोलीस उपनिरिक्षकाला आणि ज्या घरात डॉ.संपदा मुंडे राहत होत्या त्या घरमालकाला अटक झाली आहे. शासनाने पोलीस उपनिरिक्षकाला सेवेतून बर्डतर्फ सुध्दा केलेले आहे. सोबतच कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
डॉ.संपदा मुंडे यांना न्याय मिळाला की, नाही याबद्दल आज तरी काही सांगता येणार नाही. कारण डॉ.संपदा मुंडे यांच्या चार पानी अर्जात खासदारांचे नाव सुध्दा आहे. आज नांदेड शहरात वेगवेगळ्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या हातात संपदा मुंडेला न्याय मिळावा अशा आशयाचे बोर्ड घेवून जनतेचे लक्ष वेधत आहेत. यामधील महत्वाचे वाक्य असे आहे की, पुस्तकात वाचले होते की, माणुस पहिले जनावर होता पण सध्याची परिस्थिती आणि मानसीकता पाहुन असे वाटते की, आजही जनावरच आहे. डॉ.संपदा मुंडेंना न्याय मिळावा अशी वास्तव न्युज लाईव्हची सुध्दा इच्छा आहे.
डॉ.संपदा मुंडे यांना न्याय मिळवा म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे अनोखे आंदोलन
