नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील दक्षिण अंतर्गत माता रमाई विचार मंच, जवळा व माता रमाई जयंती मंडळ, जवळा यांच्या वतीने दिले जाणारे यंदाचे माता रमाई गणगोत पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये पूज्य भंते बौद्धीधम्मो यांची आई आयु. सरस्वतीबाई लक्ष्मणराव पोवळे (वसरणी, नांदेड), ख्यातनाम पत्रकार राजेश्वर कांबळे यांची आई आयु.निर्मलाबाई त्र्यंबक कांबळे (कंधार), आयु.सुनिता नागोराव डोंगरे (उमरी), सुकांता शंकरराव वाघरे, समता सैनिक आयु.दैवशाला गणेश मस्के (माळाकोळी), आयु.लक्ष्मीबाई किशन जमराज (पिंपरण), आयु. जिजाबाई विठ्ठल गोडबोले (बळीरामपूर, नांदेड) मातांचा समावेश आहे. दरवर्षी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंती निमित्ताने 7 फेब्रुवारी या दिवसाचं औचित्य साधून 7 मातांचा सन्मान गौरव जवळा ता.लोहा येथील माता रमाई विचारमंच व रमाई जयंती मंडळाच्या वतीने करण्यात येत असतो. कारण त्यागमूर्ती माता रमाईने आपल्या संसारामध्ये अतिशय त्यागमय जीवन जगून डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर साथ दिली. त्याचे प्रतीक म्हणून, त्याग करून मुलं घडविलेल्या मातांना निवड समितीच्या वतीने प्राधान्य देण्यात येत असते. त्यामध्ये भंतेजीची माता, पत्रकारांची माता, सैनिक माता, मुलं घडविलेल्या माता, अशा विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मातांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, मेडल, शाल, पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येत असतो. अतिशय आगळावेगळा हा सन्मान सोहळा जवळा (दे) ता.लोहा येथील त्यागमूर्ती माता रमाई जयंती निमित्त दि.७ फेब्रुवारी 2026 रोजी विश्वशांती बुद्ध विहार, जवळा या ठिकाणी अतिशय थाटामध्ये पार पडणार आहे. अशी माहिती रमाई विचार मंचाचे आयु.आनंद पुरभाजी गोडबोले (भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संरक्षण सचिव, नांदेड तथा आकाशवाणी प्रासंगिक निवेदक नांदेड व जयंती मंडळाच्या अध्यक्षा आयु. भारतबाई विठ्ठल निखाते यांनी दिली. Kanthak Suryatal Post Views: 633 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई ; बिलोली येथे चार विनानंबर हायवा पकडून कारवाई ‘मायबोली बालसाहित्य संगम’ ;अध्यक्ष बालसाहित्यिक दत्ता डांगे यांचा अध्यक्षीय संवाद