नांदेड(प्रतिनिधी)-सध्या नांदेड पोलीस परिक्षेत्राचा प्रभार छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरिक्षक विरेंद्र मिश्र यांच्याकडे आहे. आज ते नांदेडमध्ये आहेत. त्यांच्या आसपास कोणी पोलीस अधिकारी किंवा पोलीस अंमलदार जाणार नाही अशा आशयाचा बिनतारी संदेश नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी जारी केला आहे. विरेंद्र मिश्र यांच्या या साधेपणाची दखल घेणे आवश्यकच आहे.
पोलीस अधिक्षक कार्यालयाने दि.3 नोव्हेंबर रोजी जारी केलेला बिनतारी संदेश जा.क्र.जिवीशा/सुरक्षा/बंदोबस्त/7231/2025 दि.03/11/2025 नुसार सध्या नांदेड पोलीस परिक्षेत्राचा प्रभार सांभाळणारे छत्रपती संभाजीनगर पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विरेंद्र मिश्र हे 3 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथून निघून त्यांच्या सोयीनुसार नांदेडला येणार आहेत. त्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात असेल. दि.4 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आढावा बैठकीस ते उपस्थित राहणार आहेत.
शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहेकी, त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस महानिरिक्षक विरेंद्र मिश्र आले असतांना कोणतेही पोलीस ठाणे, कोणतेही वाहन यस्कॉर्ट व पायलेटींग नेमणार नाही आणि विशेष पोलीस महानिरिक्षकांचे वाहन जात असतांना त्यांच्या गाडीसमोर कोणी जाणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. सोबतच संपर्कासाठी विरेंद्र मिश्र यांच्या अंगरक्षकाचा मोबाईल क्रमांक नमुद केला आहे.
या बिनतारी संदेशावरुन असे नक्कीच दिसते की, कोणताही लवाजमा विरेंद्र मिश्र यांना नको आहे अशाच पध्दतीची साधी राहणी त्यांच्या व्यक्तीमत्वाला उंचीवर नेणारी असते. सर्वच पोलीस अधिकारी अशाच पध्दतीचे झाले तर महाराष्ट्रात नक्कीच रामराज्य येईल.
छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरिक्षक विरेंद्र मिश्र हे नांदेडमध्ये
