नांदेड – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी 8 मार्च 2017 अन्वये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनाचा पुरवठा करणे ही योजना सुरू केली. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना 8 मार्च 2017 च्या शासन निर्णयान्वये शासन स्तरावरुन निश्चित केल्या आहे. सदर शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील इच्छुक पात्र बचतगटांनी सन 2025-26 करीता http://mini.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. त्याची सत्यप्रत 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत समाज कल्याण, नांदेड यांच्याकडे सादर करावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 887 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरिक्षक विरेंद्र मिश्र हे नांदेडमध्ये ‘स्वारातीम’ विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांची विद्यापीठ अनुदान आयोगा(युजीसी)च्या कार्यकारी परिषदेवर नियुक्ती