धाराशिव -युवासेना उपसचिव महाराष्ट्र राज्य मनिषा वाघमारे धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरणार असून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवासेनेच्या उपसचिव म्हणून मनिषा वाघमारे यांची धाराशिव जिल्ह्यात व राज्यात आणि देशात ओळख आहे. धाराशिव जिल्ह्यात व राज्यात करोना संकट काळात व पूर परिस्थीत काळात पूरग्रस्तांनाच्या मदतीला धावून जाऊन गोरगरीबांपर्यंत मोठया प्रमाणात मदत पोहचवली. कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षित करून नोकर भरती मेळावा घेऊन जिल्ह्यातील व राज्यातील हजारो तरुण तरुणी यांना पुणे मुंबई येथे नोकरी मिळवून दिली. युवासेनेच्या माध्यमातून जिल्ह्यात व राज्यात खेडोपाडी युवकांचे संघटन वाढवण्याच काम केल आहे. सुशिक्षित युवकांची व युवतीयांची मोठी फळी यांच्या सोबत असून सामाजिक बांधिलकी असलेले सुशिक्षित युवा नेतृत्व घडावे यासाठी जि .प. च्या निवडणुकीसाठी सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा वाढल्या असून सर्व सामान्य जनतेच्या जनरेट्यामूळे पक्ष प्रमुख व लोकप्रतिनिधी नेते यांच्या मार्गदर्शनात धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे.
मनिषा वाघमारे धाराशिव जिल्ह्यात जि.प.निवडणुक लढविणार
