इतर इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर जिल्हा परिषदेचे लक्ष कधी जाणार?
नांदेड(प्रतिनिधी)-नायरायण ई टेक्नो शाळेला जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी तीन दिवसात खुलासा सादर करावा नसता शाळेची मान्यता काढण्यात येइल अशी नोटीस जारी केली आहे. ही नोटीस 29 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आली होती.
काही पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर तसेच महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षांकडे दिलेल्या तक्रारीनंतर ही नोटीस जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये विविध दहा प्रकारांमध्ये बालकांवर कसा अन्याय होतो. याचे विस्त्रत वर्णन करण्यात आले आहे. त्यानुसार या दहा मुद्यांना अनुसरून नारायणा ई टेक्नो शाळेने तिन दिवसात खुलासा करावा असे नमुद केले आहे.
नारायणा ई टेक्नो या इंग्रजी शाळेमध्ये नांदेडच्या शिक्षणाधिकाऱ्यांना गुणवत्ता खुप उशीरा दिसल्या. त्या सुध्दा बालहक्क आयोगाकडे तक्रार केल्यानंतर सुध्दा तिन महिन्यांनी नारायणा ई टेक्नो शाळेला नोटीस देण्यात आली आहे. इतर शाळांवर लक्ष देण्याची जबाबदारी सुध्दा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचीच आहे. पण त्या शाळांवर कोण लक्ष देते, त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी काय सुविधा आहेत, काय नाहीत. तसेच शाळा किती फिस घेतात. वेगवेगळे किती पैसे पुन्हा पालकांकडून वसुल करतात आणि त्यामुळे त्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून बालकांवर आणि पालकांवर होणाऱ्या अन्यायाची देखरेख करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची नाही काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
नारायणा ई टेक्नो शाळेला मान्यता रद्द करण्याची कारणे दाखवा नोटीस
