नांदेड(प्रतिनिधी)-10 हजारांची लाच स्विकारणारा तलाठी सध्या तरी तुरूंगात पाठविण्यात आला आहे. कारण हा मुळ घटनाक्रम बिलोली न्यायालयाचा आहे. बिलोली न्यायाधीश सुट्टीवर असल्यामुळे नांदेड न्यायालयाकडे हे काम आले होते.
9 ऑक्टोबर रोजी नायगाव तहसील कार्यालयासमोर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात मौजे कृष्णूर येथील तलाठी अशोक दिगंबर गिरी (46) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यांचा गुन्ह्याचा प्रकार हा बिलोली न्यायालयाकडे येतो. पण बिलोली न्यायाधीश सुट्टीवर असल्यामुळे काल तो प्रकार नांदेड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ.एस.बी.तावशीकर यांच्यासमोर आला. न्यायाधीशांनी लाचखोर तलाठ्याला एक दिवसाची पोलीस कोठडी दिली. आज पोलीस कोठडी संपल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी गिरीला न्यायालयीन कोठडीत घेण्याच्या विनंतीसह न्यायालयासमक्ष हजर केले. न्यायालयाने तलाठ्याला न्यायालयीन कोठडीत घेतले. त्यानंतर तलाठी गिरीचे वकील ऍड. मनिष रामेश्र्वर शर्मा (खांडील) यांनी जामीन अर्ज सादर केला. पण न्यायाधीश तावशीकर यांनी सदर प्रकरण बिलोली न्यायालयाचे आहे. त्यामुळे त्यांच्याकडेच जामीन अर्ज सादर करा असे सांगितले. त्यामुळे तलाठी अशोक दिगंबर गिरी यांचे सध्याचे वास्तव्य तुरूंगात आहे.
संबंधीत बातमी…
