नांदेड,(प्रतिनिधी)-एक व्यक्ती बॅंकेतून 80 हजार रुपये काढून जात असतांना त्याच्या कपड्यांवर रंग टाकून ती 80 हजार रुपयांची बॅग अज्ञात चोरट्यांनी गायब केल्याप्रकरणी भोकर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुंडलिक गंगाराम पसलवाड(70) यांनी 1 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजेच्यासुमारास बॅंकेतून 80 हजार रुपये काढले आणि ते थैलीमध्ये ठेवून ते बाजार करण्यासाठी पायी जात असतांना शिवाजी चौक भोकर येथे आले असतांना त्यांच्या शर्टवर व धोतरावर रंग टाकल्याचे दिसल्यानंतर त्यांनी साईराम मेडीकलच्या कॉन्टरवर आपल्या हातीतील थैली ठेवली आणि पाणी आणून कपडे साफ करत असतांना त्यांची नजर चुकवून ती 80 हजाराची थैली लंपास केली आहे. ही घटना भारतीय न्याय दंड संहितेच्या कलम 318(4) आणि 3 (5) नुसार गुन्हा क्रमांक 196/2024 नुसार दाखल केली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कल्पना राठोड अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 816 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ‘ योजनेसाठी कागदपत्र तयार ठेवा ! माजी खा.खतगावकर, विद्यमान खा.चव्हाण व खा.आष्टीकर जिल्हा बॅंकेचे फॉरेंन्सिक ऑडीट होवू देत नाहीत-विजयदादा सोनवणे