नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी अवैध शस्त्र बाळगणे, प्राणघातक हल्ला करणे, दरोडा टाकणे, खूनाचा प्रयत्न करणे अशा प्रकारे समाजाला त्रास देणाऱ्या एका 29 वर्षीय युवकाला स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. तो मंजुर झाल्यानंतर त्या गुन्हेगाराला छत्रपती संभाजीनगर कारागृहात पाठविण्यात आले आहे.
अर्धापूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याकडे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी भिमराव उर्फ आर्या उत्तम सरोदे (29) याच्याविरुध्द अनेक दखलपात्र गुन्हे दाखल आहेत आणि त्याची सवय तशीच आहे. म्हणून त्याच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे एमपीएडी कायद्याअंतर्गत स्थानबध्दतेचा प्रस्ताव पाठविला. तो प्रस्ताव मंजुर झाल्यानंतर भिमराव उर्फ आर्या उत्तम सरोदे यास छत्रपती संभाजीनगर येथील तुरूंगात पाठवून देण्यात आले आहे.
अर्धापूर पोलीसांनी एका युवकाला स्थानबध्द केले
