दारूच्या दुकानात गोंधळ, खंडणीची मागणी आणि दुचाकी चोरी; दोन युवक ताब्यात, पोलिसांकडून सायंकाळी वरात काढून चोप

नांदेड –वजीराबाद परिसरात 21 सप्टेंबर रोजी रात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारात दारूच्या दुकानात गोंधळ घालणाऱ्या आणि खंडणीची मागणी करत एका व्यक्तीला मारहाण करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली. या प्रकारानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुचाकी चोरीचाही प्रकार घडला. संबंधित युवकांनी परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे वजीराबाद पोलिसांनी कडक पाऊल उचलत, दोघांची सायंकाळी सर्वांसमोर वरात काढून जाहीरपणे पोलिसी धडा शिकवला.

 

घटना कशी घडली?

दि. 21 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वाजता वजीराबाद येथील रितेश अमृतलाल जयस्वाल यांच्या दारूच्या दुकानात दोन युवक दाखल झाले. त्यांनी दुकानातून दारू घेतल्यानंतर पैसे मागितले असता, “दारू फुकटच द्यावी लागते आणि वर १० हजार रुपये महिना खंडणीही द्यावी लागते,” असे धमकीच्या सुरात बोलत त्यांनी दुकानात गोंधळ घातला. दुकानातील दारूच्या बाटल्या फोडल्या आणि एका बाटलीने कामगाराच्या डोक्यात मारहाण करून त्याला जखमी केले.त्या वेळी दुकानात संदीप रेणके, विनोद ठाकूर, नंदकुमार मद्रेवार आणि आनंद खंदारे हे कर्मचारी उपस्थित होते. या घटनेनंतर संबंधित दोघे तेथून निघून गेले. काही वेळातच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभी असलेली एक दुचाकी बळजबरीने पळवली.

 

तपास आणि अटकेनंतर धडा

घटनेची माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक रामेश्वर व्यंजने, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू वटाणे, उपनिरीक्षक बालाजी किरवले,पोलीस अंमलदार शिवसांभ मठपती, ज्वालासिंग बावरी, संतोष पोकले, विलास कदमआणि त्यांच्या पथकाने तत्काळ तपास सुरू केला. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना ओळखण्यात आले आणि काही तासांतच त्यांना ताब्यात घेण्यात आले.

 

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:

परमजीत सिंग दर्शन सिंग संधू (वय 21)

सतपाल सिंग बालासिंग धारिवाल (वय 25)

सायंकाळी काढली ‘विशेष वरात’

या प्रकारामुळे परिसरात निर्माण झालेली दहशत लक्षात घेता, पोलीस अधीक्षक परमेश्वर कदम यांच्या नेतृत्वाखाली दोघांची आज सायंकाळी ‘पोलीस वरात’ काढण्यात आली. या वरातीत पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते. जनतेला संदेश देण्यासाठी आणि इतरांनाही इशारा देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.

 

वरातीमध्ये सहभागी अधिकारी व कर्मचारी:

पोलीस उपनिरीक्षक सुनील बुलंगे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी किरवले ,पोलीस अंमलदार रमेश सूर्यवंशी,भाऊसाहेब राठोड,गणेश धुमाळ,अरुण साखरे,गीते ,मुलगीर ,यादव,सचिन वाडेकर

या प्रकारामुळे समाजात दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अशा प्रकारांना बळी न पडता त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वरातीचे व्हिडीओ ….. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!