नांदेड : पुष्पा जगदीश कदम(६८) यांचे अल्पशा आजाराने येथील खाजगी रूग्णालयात आज निधन झाले असून आज दि.२२ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता कैलासनगर(भाग्यनगर चौरस्ता)येथून अंत्ययात्रा निघून गोवर्धनघाटला अंत्यविधी करण्यात येणार आहेत.पुष्पा कदम या जिल्हा परिषदेच्या हायस्कूल मध्ये सहशिक्षिका ते मुख्याध्यापिका असा प्रवास त्यांनी केला आहे .नांदेड येथील मुलींचे हायस्कूल आणि मालेगाव येथील जि.प.हायस्कूल येथे दीर्घकाळ सेवा बजावली.उत्कृष्ट शिक्षिका म्हणून जिल्हा परिषदेतर्फे गौरव.कुरूंदा येथील दिवंगत स्वातंत्र्य सैनिक नानासाहेब दळवी यांच्या कन्या तसेच साहित्यिक डॉ.जगदीश कदम यांच्या पत्नी.त्यांच्या पश्चात एक मुलगा,सून,दोन नातू असा परिवार आहे. Kanthak Suryatal Post Views: 939 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation धनखड गेले… पण कोणाच्या इशाऱ्यावर?धनखडांचे स्वप्नभंग–भाजपनेच केली ‘राजकीय बेअब्रू’ शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात आणि स्थानिक कार्यकर्ते मनोज यादव यांना बंडू खेडकरांचे शिवसेना स्टाईल प्रश्नोत्तर