ज्याप्रमाणे पवनपुत्र हनुमान यांनी लंकेत आग लावली होती. त्याप्रमाणे आजच्या ए.आयच्या काळात ग्रोक या ए.आय.ने भारतीय जनता पार्टी , त्यांचा पाळी मिडीया आणि पसरवलेल्या खोट्या आफवांबद्दल ग्रोकने केलेला खुलासा अनेकांच्या वर्णी लागणार आहे. ट्विटर आता एक्स झाले आहे. या एक्समध्ये एक ए.आय.टुल आहे. त्याचे नाव ग्रोक असे आहे. त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ते स्पष्टपणे देतात आणि सोबतच आपल्या टिपण्यासुध्दा त्यात जोडतात. ग्रोक ही कल्पना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांचे मित्र एलोन मस्क यांची आहे. आज सर्वत्र आर्टिफीशीयल इंटीलिजन्सचा वापर करा असा प्रचार होत आहे. मग याचा उपयोग पण घेतलाच पाहिजे. अशाच पध्दतीने भारताच्या संदर्भाने काही बाबी प्रश्नांच्या स्वरुपात विचारण्यात आल्या तेंव्हा ग्रोकने दिलेले उत्तर धक्कादायक आहे. त्यावरून आजपर्यंत सुध्दा किती खोटा ईतिहास ऐकून किती विश्र्वास करत होतो हे सुध्दा दिसते.

ग्रोंकला विचारलेल्या प्रश्नांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीचे प्रश्न आहेत?, राहुल गांधी यांच्या कार्यक्षमतेचे प्रश्न आहेत. सोनिया गांधी बार डान्सर होत्या काय हा सुध्दा प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात भारतीय जनता पार्टी खोटा प्रचार करते तो अत्यंत स्पष्टपणे उघड पडला आहे. भारतीय जनता पार्टीचा प्रमुख अमित मालवीय, प्रवक्ता संदीप पात्रा हे अनेकदा खोटे बोलतांना उघड पडले आहेत. हे सर्व घटनाक्रम मागील 60 तासात घडले आहे. पहिल्याच प्रश्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खा.राहुल गांधी यांच्या शिक्षणाचा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्या राहुल गांधी यांनी हारवर्ड विद्यापीठातून पदवी घेतली आहे. केब्रिज विद्यापीठातून एमफील पदवी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कला शाखेची पदवी दिल्ली विद्यापीठातून आणि कला शाखेची पदव्योत्तर पदवी गुजरात विद्यापीठातून घेतली आहे. मात्र या दोन्ही पदव्यांमध्ये अनेक प्रश्न आहेत. ग्रोकने दिलेल्या उत्तराचा अर्थ असा होतो की, खा.राहुल गांधी शिक्षणाच्या दृष्टीकोणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खुप पुढे आहेत. ग्रोक हा काही व्यक्ती नाही. त्याच्याकडे कोणाच्या संदर्भाने जोडणी केलेली नाही. म्हणून तो जे काही उत्तर देतो ते निपक्षपाती असते. आजच्या परिस्थितीत जगातील दशा आणि दिशा आर्टिफीशीयल इंटिलीजन्स ठरवत आहे. भारतीय जनता पार्टीचे मंडळी कधी बर्नाल लावा असे म्हणत होती. आता त्यांनाच बर्नाल लावण्याची वेळ आली आहे. सध्या भारत देशाचे नेतृत्व कोणी करावे ती ताकत कोणाकडे आहे. या प्रश्नाच्या उत्तरात ग्रोकने ही क्षमता खा.राहुल गांधीमध्ये असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे विष पसविण्याचे काम नाही. फोडा-फोडी नाही, सर्वांना एकत्र घेवून चालण्याची क्षमता आहे. त्यांनी सी.ए.ए.संदर्भाने उचललेले पाऊल सुध्दा जनतेला आवडलेले आहे.

ग्रोककडे भारतीय स्वतंत्र संग्रामात मुस्लिम समाजाचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा किती सहभाग होता हे उत्तर देतांना मुस्लिम समाजाला महत्व दिले आहे. तसेच आरएसएसने स्वातंत्र्य संग्रामात काहीच केलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2014 मध्ये एकच पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर 2019 मध्ये एका पत्रकार परिषदेत अमित शाह यांच्यासोबत ते बसले होते. परंतू त्यांना कोणताही प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देण्यासाठी इशारा ते अमित शाह यांच्याकडे करत होते. ग्रोक सांगतो नरेंद्र मोदी हे फक्त मुलाखती देतात आणि त्या मुलाखतीमधील प्रश्न सुध्दा अगोदरच ठरलेले असतात असेच ते प्रश्न असतात. सोनिया गांधी बार डान्सर होत्या काय या प्रश्नाचे उत्तर देतांना ग्रोक सांगतो की, त्या कधीच नृतिका नव्हत्या. त्यांचे खरे नाव एंटोनिया मेनो असे आहे. त्या ईटलीच्या एका छोट्या गावातील रहिवासी आहेत. तेथे त्यांनी हॉटेलमध्ये बार अटेंडट म्हणून काम केले आहे. त्यांच्या नृत्यासंदर्भाने कोणताही पुरावा उपलब्ध नाही. या उत्तरात ग्रोंकने खरे शोधा अशी टिपणी केली आहे.

प्रियंका देशमुख यांनी ग्रोंकला प्रश्न विचारला होता की, कोणता रेल्वे मंत्री देशातील उत्कृष्ट रेल्वे मंत्री होता. यावर ग्रोंकने उत्तर दिले आहे की, सन 2004 ते 2009 या वेळेत लालुप्रसाद यादव हे रेल्वे मंत्री होते. सर्वसामान्य जनतेला वातानुकुलीत प्रवास त्यांनी गरीब रथाच्या माध्यमातून दिला. त्यावेळेस रेल्वेचे उत्पन्न सुध्दा खुप वाढले होते. त्यांच्या काळात 25 हजार कोटीचा नफा रेल्वेला झाला होत्या. ग्रोंकला एक प्रश्न विचारला की, देशातील कोणत्या नेता सर्वात जास्त गुन्हे दाखल झालेला आहे. त्याचे उत्तर ग्रोंकने योगी आदित्यनाथ असे उत्तर दिले. त्यांच्याविरुध्द जवळपास 28 गुन्हे दाखल होते. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ते खटले सार्वजनिक हित या सदराखाली आपल्यावरचे गुन्हे मागे घेतले. आर.के.राजस्थानी याने ग्रोंकला विचारले की, भारतामध्ये गोदी मिडीयांचे नावे सांगा.तसेच दलाल अँकर कोण आहेत हे स ांगात त्याला ग्रोंकने असे उत्तर दिले की, त्यात रिपब्लिक भारत, झी न्युज, आजतक, एबीपी न्युज, इंडिया टी.व्ही., टाईम्स नाऊ आणि सुदर्शन न्युजचे नाव दिले आहे. दलाल अँकर याला ग्रोंकने रिपब्लिक भारतचे अर्नब गोसामी आणि आज तकचे सुधीर चौधरी यांचे नाव दिले आहे. हे ओरडून ओरडून प्रोपोगंडा करण्यात माहिर असल्याचे सांगितले. तिहाडी हा कोणाचे नावे आहे हा प्रश्न ग्रोंकला विचारला असता तेंव्हा त्यांनी त्याच्या उत्तरात सुधीर चौधरी यांचे नाव दिले. पत्रकार अजित अंजुम यांनी ग्रोंकला विचारले की, भारतात बी आणि डी या शब्दांचा काय अर्थ आहे. याला उत्तर देतांना बी ऍन्ड डी हा एक टोला असून तो न्युज 18 इंडियाच्या अँकर अमिश देवगणसाठी प्रसिध्द आहे. त्यांच्या एका आरपार नावाच्या कार्यक्रमात कॉंगे्रस नेता राजीव त्यागी यांनी या दोन अक्षरांचा उपयोग त्यांच्यासाठी केला होता.

आजच्या परिस्थितीत भारतातील उत्कृष्ट पत्रकारांची नावे विचारली असता ग्रोंकने रविशकुमार, अभिसार शर्मा, पुन्यप्रसुन वाजपेयी, निधीराजदान , प्रतिक सिन्हा, मोहम्मद जुबेर, जयसन बुक्रे यांची नावे दिली आहेत. भारत स्वातंत्र्यानंतर अंतरीम सरकारमध्ये पंतप्रधान असणारे पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी त्यांची 98 टक्के संपत्ती 196 कोटी रुपयांची भारत सरकारला दान दिली होती. त्यात आनंद भवन हे नव्हते. आनंद भवन पुढे इंदिरा गांधी यांनी देशाला दान दिले होते. पंडीत नेहरुनी 1946 मध्ये दानाची किंमत आजच्या दराप्रमाणे 49 हजार कोटी रुपयांची आहे. ग्रोंका प्रश्न विचारण्यात आला की, महात्मा गांधी यांनी शहिदे आजम भगतसिंघ यांना फाशी पासून का वाचविले नाही. त्याच्या उत्तरात ग्रोंक म्हणतो की, महात्मा गांधी यांनी खुप मेहनत घेतली ते अनेकदा व्हाईसरायाला भेटले. त्यांच्यामध्ये आणि भगतसिंघमध्ये काही वाद होता असे पुरावे उपलब्ध नाहीत. या उत्तरात ग्रोंकने अंधभक्ती सोडा आणि सत्यता पाहा अशी आपली टिपणी लिहिली आहे. टिपु सुलतानने सुध्दा आपल्या जीवनात इंग्रजांशी लढले याचा उल्लेख पण केला आहे. सोबत बरेच प्रश्न स्वातंत्र्य विर सावकरांचे प्रश्न आहेत. ज्याबद्दल खा.राहुल गांधी गुन्हे भोगत आहेत. आजच्या परिस्थितीत ग्रोंकने भारतीय जनता पार्टीला उघड पाडल्यानंतर सर्वांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे.

