नांदेड(प्रतिनिधी)-आज दुपारी 2 वाजेच्यासुमारास अर्धापूर वळण रस्त्यावर एका ट्रकच्या धडकेत एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
महामार्ग सुरक्षा पथक अर्धापूर यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर अर्धापूर वळण रस्त्यावर ही घटना घडली आहे. त्या ठिकाणी दुचाकी क्रमांक एम.एच.38 ए.जी. 3819 यावर बसून शंकर वाघोजी खांडरे (40) रा.डोंगरकडा हे अर्धापूर ते डोंगरकडा प्रवास करत होते. त्यावेळी एम.एच.34 एच.9786 या ट्रकचा पाठीमागील टायरखाली आल्याने अपघात जावून खांडरे मरण पावल्याची माहिती लोकांनी दिली. महामार्ग सुरक्षा पथक त्वरीत तेथे पोहचले. मरण पावलेल्या खांडरे यांना रुग्णवाहिकेत टाकून अर्धापूरच्या शासकीय दवाखान्यात नेले आणि या संदर्भाची माहिती पोलीस ठाणे अर्धापूर यांना दिली. रस्त्यावरील ट्रक आणि दुचाकी महामार्ग पोलीस पथकाचे पोलीस उपनिरिक्षक टाकरस, पोलीस अंमलदार डवरे, सुर्यवंशी, कदम आणि सेवक वसंत शिंगारे यांनी पुर्ण केली.
अर्धापूर वळण रस्त्यावर दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू
