नांदेड –विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 12 सप्टेंबर, 2025 रोजी विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक नांदेड विभागीय कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस नांदेड विभागातून विविध ठिकाणाहून 13 सदस्य उपस्थित झाले होते. डॉ. विजय कृष्णा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड यांनी नांदेड विभागाने गेल्या वर्षभरात केलेल्या विविध कार्याची माहिती दिली, रेल्वे प्रवाश्यांकारिता करत असलेल्या विविध कार्याचे सल्लागार समितीने कौतुक केले. नांदेड विभागात होत असलेल्या विविध विकास कामांची माहिती डॉ. विजय कृष्णा यांनी उपस्थितांना दिली. सल्लागार समिती सदस्यांनी विविध स्थानकावर असलेल्या समस्यांचे समाधान करण्या करिता मागणी केली. नांदेड येथून मुंबई करिता नवीन रेल्वे सुरु करणे, नागपूर-मुंबई रेल्वे पुन्हा सुरु करणे, औरंगाबाद-मुंबई नवीन रेल्वे सुरु करणे, उत्तर भारतात जाण्या करिता नवीन रेल्वे सुरु करणे , विविध एक्स्प्रेस मध्ये डब्बे वाढविणे आदी मागण्या मांडल्या. श्री कामले यांनी कळविले कि नांदेड विभागातून नवीन गाडी सुरु करण्यासाठी नांदेड विभाग दर वर्षी मुख्यालय कडे प्रस्ताव पाठवत आहे. पुढील निर्णय मुख्यालय तसेच रेल्वे बोर्ड घेतील. प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी सर्व सदस्यांना कळविले कि नांदेड विभागाने गत वर्ष भरात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नवीन नांदेड – फिरोझपूर एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस चा विस्तार, औरंगाबाद आणि जालना रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण, अमृत भारत योजने अंतर्गत 15 रेल्वे स्थानकांचा विकास, नांदेड आणि औरंगाबाद स्थानकांवर प्रीपेड वातानुकुलीत प्रतीक्षालय तसेच बेटरी चालीत लगेज गाडीची सुविधा, प्रवाशांच्या सुविधे करिता विविध ठिकाणी विशेष गाड्या चालविणे, गाड्यांना अतिरिक्त डब्बे जोडणे, आदी महत्वाची कार्य केल्याचे श्री कामले यांनी सांगितले. या बैठकीत उपस्थित विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती सदस्यांतून श्री राम चव्हाण यांची क्षेत्रीय रेल्वे उपभोक्ता समितीवर सदस्य पदी (ZRUCC MEMBER)निवड करण्यात आली. या निवडी बद्दल डॉ. विजय कृष्णा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, रितेश, वाणिज्य व्यवस्थापक तसेच इतर विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती सदस्यांनी श्री चव्हाण यांचे अभिनंदन केले. Kanthak Suryatal Post Views: 1,077 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अर्धापूर वळण रस्त्यावर दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी 15 सप्टेंबर रोजी महिला लोकशाही दिन