नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर ते कर्नाटकातील औरादकडे जाणारी एस.टी.महामंडळाची बस बल्लूर गवंडगाव जवळ दरीत पडली आणि त्यामुळे 28 प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
बुधवारी हा अपघात घडला. सततच्या मुसळधार पावसामुळे देगलूर भागातील अनेक रस्ते आणि पुल धोकादायक झाले होते. लोणी येथील निझामकालीन पुलाचा काही भाग कोसळल्याने देगलूर-औराद हा मार्ग मागील सहा दिवसांपासून बंद होता. त्यामुळे देगलूर आगाराच्या बससेवा गवंडगावा-माळेगाव-हाणेगाव मार्गे औराद असा पर्यायी मार्ग वापरून जात होत्या. अचानकच एका वळणावर चालकाचे नियंत्रण गाडीवरून सुटल्याने एस.टी. क्रमांक एम.एच.20 बी.एल.1152 ही एसटी गाडी खाली दरीत गेली. त्यामुळे 28 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एस.टी.गाडी दरीत गेली; 28 प्रवासी जखमी
