नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने 17 पोलीस निरिक्षकांना पदोन्नती देवून त्यांना पोलीस उपअधिक्षक पदावर नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. तसेच 7 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट रोजी पदोन्नती देवून पदस्थापना देण्यात आलेल्या 10 पोलीस उपअधिक्षकांना नवीन नियुक्त्या बदलून दिल्या आहेत. त्या नांदेड येथील माहुर पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक बदलले आहेत.
राज्य शासनातील गृहविभागाचे सचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झालेल्या आदेशात 17 पोलीस निरिक्षकांना पोलीस उपअधिक्षक अशी पदोन्नती देवून त्यांना नवीन पदस्थापना दिली आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. राजेश शांताराम देवरे, प्रमोद ज्ञानेश्र्वर बाबर, भिमराव सत्या पाखंडाळे, अनिल आत्माराम पाटील-सहय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, हनुमंत विठ्ठलराव गिरमे, राजेंद्र प्रल्हाद पाटील-सहाय्यक पोलीस आयुक्त अमरावती, अशोक आनंदराव भवड-तासगाव उपविभाग, सांगली, मोहन गणपती पाटील-सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे, संजय गंगाधरराव पाटील, रमेश बाजीराव जायभाये-पोलीस उपअधिक्षक अंमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्स, यशवंत भाऊराव बावीसकर-मालेगाव ग्रामीण उपविभाग, नाशिक,सुभाष मुरलीधर ढवळे-मुक्ताईनगर उपविभाग जळगाव, कुंदनकुमार बापुराव वाघमारे-उपविभाग हिंगोली शहर, दिलीप शिशुपाल पवार-सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर, मुक्तार दाऊद इब्राहिम शेख-आर्थिक गुन्हे शाखा रत्नागिरी, विशाल दशरथ काळे-भंडारा उपविभाग, भंडारा, अनिल बबन कटके-गेवराई उपविभाग, बीड.
राज्य शासनाने 7 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट रोजी पोलीस निरिक्षकांना पदोन्नती देवून नवीन पदस्थापना दिल्या होत्या. आता त्यात बदल करून त्यांना नवीन पदस्थापना दिल्या आहेत. त्यांच्या नवीन पदस्थापना कंसात लिहिल्या आहेत.
पराग बापुराव पोटे-जात पडताळणी समिती अरावती (काटोल उपविभाग, नागपूर ग्रामीण), अशोक बापु होनमाने-नियंत्रण कक्ष मुंबई(सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे), रविंद्र सुभाष नाईक-पोलीस मुख्यालय सिंधदुर्ग(पोलीस उपअधिक्षक मुख्यालय पालघर), सतिश विष्णु शिवरकर-पोलीस उपअधिक्षक मुख्यालय रायगड(सहाय्यक पोलीस आयुक्त मिरा-भाईंदर-वसई-विरार), दिनेश महादेव शेळके-माहुर उपविभाग,नांदेड(वाचक पोलीस उपअधिक्षक आयजीपी अमरावती परिक्षेत्र), रोषण भुजंगराव पंडीत-मालेगाव कॅम्प नाशिक(चंद्रपुर उपविभाग, चंद्रपुर), सुर्दशन प्रकाश पाटील-सहाय्यक पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर(अकोला शहर उपविभाग), आनंद विष्णु चव्हाण-उपविभाग साकोली, भंडारा(सहाय्यक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई), स्वप्नील राजाराम राठोड-पदस्थापनेच्या प्रतिक्षेत(उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव, बुलढाणा), प्रसाद शंकर गोकुळे-पोलीस उपअधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे(रोहा उपविभाग, रायगड).
27 पोलीस उपअधिक्षकांना गणपती आगमनापुर्वी नवीन पदस्थापना
