पुराव्यासह राहुलजी गांधी यांनी 2024 साली निवडणुकीमध्ये झालेले गुन्हेगारी कृत्य जगापुढे मांडले.त्यातील सत्य असत्य शोधून काढण्याची भाषा करण्याऐवजी
“राहुल गांधी यांच्या डोक्यातील चिप चोरीला गेली” अशा आशयाची वल्गना देवेंद्र फडणवीस यांनी केली.प्रत्येक माणूस आपल्या डोक्यातील चिप नुसार वर्तन करतो. देवेंद्रजी व राहुलजी दोघेही चिंपांजी माकडापासून उत्क्रांत झाले. तरी प्रत्येकाची डोक्यातील चिप बालपणी केलेल्या संस्कारा (programing) नुसार तयार होते. गर्भ संस्काराच्या वेळी देवेंद्रच्या आईने व वडील गंगाधर पंत यांनी बाळ देवेंद्राला ऋग्वेदाचा आधार घेत सांगितले की आपण सनातनी ब्राह्मण. आपले पूर्वज ब्रह्माच्या मुखातून जन्मले.इतर लोक बाहू, पाय यातून. त्यामुळे आपण सर्व जीवात श्रेष्ठ ठरतो. पुढे असेही सांगितले की ज्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने विश्व निर्माण केले तेंव्हा ज्यांचे सत्व गुण होते त्यांना ब्राह्मण बनविले. त्यांना भूतलावरील देव बनविले . कितीही भ्रष्ट असले तरी ते तिन्ही लोकी श्रेष्ठ राहतील. इतराना उरलेल्या वर्णात घातले.त्यात मी आता बदल करू शकत नाही असे भगवान श्रीकृष्णाने कुरु क्षेत्रात सांगितले. ते भगवत गीता आणि मनुस्मृती यांचा संदर्भ देत देवेंद्रच्या कोवळ्या मेंदूवर नोंदविले. न कळत्या वया पासून अर्धी चड्डी,शाखा माहित असल्याने राज्य घटना, तिरंगा देवेंद्र ला मान्य नाही.
राहुल गांधी वर बालपणी कोणते संस्कार झाले? त्याची चिप कशी बनली? पंजोबाने तुरुंगात जाऊन स्वातंत्र्य मिळविण्यात पुढाकार घेतला.देश घडविला. आजीने अंगावर गोळ्या झेलत खरे नेतृत्व जगाला दाखविले. वडिलांनी रक्त सांडले. असे संस्कार आणि वातावरण यामध्ये राहुलजींची चीप तयार झालेली आहे. नुकतेच त्यांनी विश्वगुरूला पार्लमेंट मध्ये पाणी पाजले. ती देशाला पुढे घेऊन जाणारी,सर्वांचे कल्याण करणारी, जनतेच्या जीवनाची प्रत सुधारणारी, जीवनमानाचा दर्जा उंचावणारी आहे. तर देवेंद्रची चिप ही फक्त ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व व शोषण करण्याचे अधिकार वाढवणारी आहे. आणि हाच देवेंद्र आपल्या ब्रह्म वृंदांच्या व भाडोत्री गुलामांच्या सहायाने निवडणूक आयोगाला हाताशी धरून सत्ता काबीज करतो. फक्त आपल्या डोक्यातील कावेबाज चिपच्या सहायाने.
स्वतःला मालक जमात म्हणविणाऱ्या अशा टोळ्यांनी मानवी संस्कृतीमध्ये धुमाकूळ घातला होता. त्यावर उपाय म्हणून युरोपमध्ये रेनीसांस, चीनमध्ये मावो, जपानमध्ये माझी,…, अशा असंख्य क्रांती झाल्या. आपल्याकडे तसे काही झाले नाही.
खरी गरज आहे ती देवेंद्र व मंडळींची चिप बदलण्याची. आणि ती लोकशाही पद्धतीने बदलता येऊ शकते.त्यासाठी तिसरी क्रांती आणावी लागेल. त्याची व्यूह रचना ढोबळ मानाने मी मांडलेली आहे.
–सुरेश खोपडे
