जर एकही काच फुटली नाही, मग मदत कुणाला दिली जाते? – डोभाल साहेब खोटे का बोलताय हो !

“ऑपरेशन सिंधुदुर्ग”बद्दल बोलताना भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षात भारताचा एकही काच फुटला नाही. त्यांनी आव्हान दिलं की, कोणी मला एक तरी फोटो दाखवावा ज्या आधारावर भारताचे नुकसान सिद्ध होईल.

मात्र, The Print या वृत्तपत्रानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या बॉम्बहल्ल्यांमुळे नुकसान झालेल्या घरांसाठी २५ कोटींचा निधी जाहीर करण्यात आला आहे. या अहवालात म्हटले आहे की, पूर्णपणे क्षतिग्रस्त घरांना १ लाख रुपये व अंशतः क्षतिग्रस्त घरांना ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. आज तक या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, काही घरांना १.३ लाख रुपये आणि काहींना १० हजारांपर्यंत मदत जाहीर झाली आहे.तर, प्रश्न उपस्थित होतो की जर अजित डोभाल यांच्या म्हणण्यानुसार भारताचे काहीच नुकसान झाले नाही, तर मग सरकार ही मदत कोणासाठी देत आहे?

अजित डोभाल यांनी म्हटले की भारताचे नुकसान झालेच नाही. मात्र जम्मू-काश्मीरमधील पूंछ आणि राजौरीमध्ये बॉम्बहल्ल्यांत घरे उद्ध्वस्त झाली आहेत, नागरिक मारले गेले आहेत, हे वास्तव त्यांनी पाहिले नाही का?अजित डोभाल हे देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत, त्यामुळे त्यांचे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे ठरते. IIT मद्रासच्या विद्यार्थ्यांपुढे बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. पण आज मोबाईलच्या युगात हे सर्व नोंदवले जाते आणि विद्यार्थ्यांनाही या गोष्टींची माहिती असते.

मोहम्मद इक्बाल कारी नावाचे शिक्षक पाकिस्तानच्या हल्ल्यात मारले गेले, त्यांना भारतीय मीडियाने ‘आतंकवादी’ ठरवलं होतं. त्याचप्रमाणे, कॅप्टन शिवकुमार यांनीही सांगितले होते की ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने भारताचे एक लढाऊ विमान पाडले होते. CDS अनिल चव्हाण यांनी सुद्धा एका परदेशी चॅनेलला मुलाखतीत नुकसान मान्य केले होते.राफेल बनवणाऱ्या कंपनीने सुद्धा एक विमान तांत्रिक बिघाडामुळे पडलं असल्याची कबुली दिली आहे. यामुळे हे खूप गंभीर प्रकरण ठरतं.तुम्ही पाकिस्तानचं नुकसान झालं असं म्हणता, ते खरं असेलही. पण भारताचं नुकसानच झालं नाही, याचा दावा करताना तुम्ही खूप महत्त्वाच्या गोष्टी लपवताय. सरकारने जर विमान पडले असल्याचं मान्य केलं असतं, तरीही जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला असता.

राहुल गांधी यांनी भारतात पडलेल्या प्रत्येक घरात भेट दिली. आणि विदेशी मीडिया पाकिस्तानच्या बाजूने बातम्या का छापतो याचे कारण म्हणजे भारत सरकारची ‘लपवा-छपवा’ नीती. भारताने अनेक वेळा विदेशी मीडियाच्या पत्रकारांना देशाबाहेर काढले आहे, त्यामुळे ते सरकारविरोधी भूमिका घेतात.भारताच्या विजयाची फसवणूक केली जाते हेच यातून दिसून येतं. ‘ऑपरेशन सिंदूर’चा विजय म्हणून प्रचार करण्यात आला, पण प्रत्यक्षात त्यात काम करणाऱ्यांनाच दुय्यम वागणूक मिळाली.

अजित डोभाल यांनी IIT चे व्यासपीठ वापरून देशात एकही काच फुटली नाही, असं खोटं विधान केलं. तर त्यांनी हे लक्षात घ्यावं की, आजची तरुण पिढी सुज्ञ आहे आणि खरे-खोटे ओळखण्याइतकी समजूतदार आहे.अखेर, आपला देश जगासमोर विश्वगुरु म्हणून ओळखला जावा, अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. पण त्यासाठी पारदर्शकता, प्रामाणिकता आणि खरेपणाने काम करणे आवश्यक आहे. खोटं बोलून ते साध्य होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!