नांदेड – गूजराती हायस्कूल, नांदेडच्या २००५ बॅचचा स्नेहमेळावा २० वर्षांनी मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात १२० हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचा आनंद लुटला.
शालेय मित्रांशी पुन्हा भेट, गप्पा, जुन्या आठवणी, फोटोसेशन आणि हास्यविनोद यामध्ये संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते.
या विशेष प्रसंगी २००५ बॅचचे शिक्षक – एल. के. कुलकर्णी सर, थापे टीचर, चंद्रकला टीचर, टोके टीचर, डी. एस. कुलकर्णी सर, मण्णीकर टीचर , ज्योती देशमुख टीचर,– यांचा विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. उपस्थित शिक्षकांनीही जुन्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
विशेष बाब म्हणजे ह्या बॅच मधील बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थीनी आज परेदेशात अनेक ठिकाणी उच्च पदावर कार्यरत आहेत. ह्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी व प्रत्येकाशी संपर्क साधण्यासाठी चार ते पाच महीन्याचा कालावधी लागला. या मध्ये महीलानीही फार मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश नवीन पीढी ला आपल्या गुरूजनाचा आदर सत्कार करण्याची प्रेरणा मिळावी व आयुष्यात ज्या लोकांनी सहकार्य केले त्यांचे आभार व्यक्त करण्याची भारतीय परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रेरणादायी ठरावे, जाती भेद विसरून आपसी भाईचारा व संवाद वाढवून नांदेडच्या भावी पिढीला आवश्यकता भासल्यास प्रत्येकाने आपापल्या परीने मदत करावे हा उद्देश ठेवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात पार पडले. सर्व उपस्थितांनी हा स्नेहमेळावा संस्मरणीय ठरवला आणि पुढेही असेच एकत्र येण्याचे वचन दिले.
