नांदेड(प्रतिनिधी)-शेत सर्व्हे नंबर 16 मधील 2 हेक्टर 79 आर हे वडीलोपार्जित शेतीमधील 1 हेक्टर 39 आर शेती पत्नीच्या नावावर करण्यासाठी 16 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या दोन तलाठी महिला नांदेड येथील दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी उद्या पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. दि.29 मे रोजी लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात आलेल्या तक्रारीनुसार त्या तक्रारदाराकडे असलेल्या जमीनीतील काही हिस्सा पत्नीच्या नावाने करण्यासाठी मौजे पांगरा सज्जा सिंदगी येथील तलाठी भाग्यश्री भिमराव तेलंगे या लाच मागणी करीत होत्या. या संदर्भाने लाच मागणीची पडताळणी झाली आणि 3 जून रोजी तलाठ्यांच्या खाजगी कार्यालयात किनवट येथे तेलंगे यांची भेट घेतली असता तेंव्हा माझी बदली झाली आहे. तुमचे काम गवळे मॅडमकडे आहे असे सांगितले आणि त्यांना भेटायची सुचना केली. दोन्ही महिला तलाठ्यांनी आपासात चर्चा करून काय करायचे यावर चर्चा केली आणि काम करायचे नसेल तर फाईल देवून टाक असेही सांगितले. एकाच गोष्टीला दहावेळेस सांगायला आम्हाला वेळ नाही असा दम पण दिला. शेवटी 16 हजार रुपये घ्यायचे ठरले. ही सर्व पडताळणी वॉईस रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भाग्यश्री भिमराव तेलंगे (34) सज्जा निचपुर ता.किनवट रा.हनुमानमंदिरसमोर गोकुंदा, किनवट तसेच सुजाता शंकर गवळे (25) तलाठी सज्जा कनकवाडी ता.किनवट रा.एकतानगर गोकुंदा यांना अटक केली. हा गुन्हा क्रमांक 169/2025 पोलीस ठाणे किनवट येथे दाखल झाला. तपास अधिकारी पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी पकडलेल्या दोन्ही तलाठ्यांना आज न्यायालयात हजर केले. जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी तपासाच्या प्रगतीसाठी दोन्ही महिला तलाठींची पोलीस कोठडी देणे आवश्यक असल्याचा मुद्दा न्यायालयात मांडला. नांदेडचे दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी दोन्ही महिला तलाठ्यांना 5 जून 2025 अर्थात उद्यापर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,389 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हदगाव तालुक्यातील वडगाव येथे घरफोडून 1 लाख 70 हजारांची चोरी; धर्माबादमधील आंध्र बसस्थानकात 60 वर्षीय महिलेचे गंठण बळजबरी चोरले दरोड्यातील सोने नांदेडमध्ये खरेदी करणारा सोनार आणि त्याला विकणारा व्यक्ती दोन्ही पोलीसांच्या ताब्यात