नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील पासदगाव रस्त्यावर तीन अज्ञात लोकांनी भाजीपाला विक्री करण्यासाठी जाणाऱ्या दोघांना धाक दाखवून त्यांचा मोबाईल व पाचशे रूपये रोख असा 10 हजार 500 रूपयांचा ऐवज बळजबरीने चोरला आहे.
गंगाधर रघुधर शेजुळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. 10 मे रोजी सकाळी 4.30 वाजता ते आणि त्यांचे चुलत बंधू भाजीपाला विक्री करण्यासाठी तरोडा नाक्याकडे येत असताना तीन जणांनी त्यांच्याकडे दुचाकी आडवी लाऊन त्यांना धाक दाखवून मोबाईल 10 हजार रूपये किंमतीचा आणि 500 रूपये रोख अशी 10 हजार 500 रूपयांची लूट केली आहे.
लिंबगाव पोलिसांनी हा गुन्हा 65/2025 या क्रमांकानुसार दाखल केला आहे. सर्वात गंमतीदार माहिती पोलिसांनी आपल्या प्रेसनोटमध्ये दिली आहे, याही गुन्ह्याचा तपास भाग्यनगर पोलीस उपनिरीक्षक वाडेवाले हे करीत आहेत. कॉपी पेस्ट करून प्रेसनोट तयार करण्यामध्ये हा घोळ झाला असेल पण इतरांच्या चुकासाठी कायद्याचा उपयोग करणाऱ्या पोलिसांकडून असे झाल्यामुळे हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
भाजीपाला विक्रेत्यांना लुटले; भाग्यनगर आणि लिंबगावचा तपासीक अंमलदार एकच
