बिअर बार फोडून 20 हजार रुपये रोख रक्कम आणि 8 बिअरच्या बॉटल्या चोरल्या

नांदेड(प्रतिनिधी)-नरसी रस्त्यावरील अटकळी शिवारात एक बिअर बार फोडून चोरट्यांनी त्यातील 20 हजार रुपये रोख रक्कम आणि स्वत: पिण्यासाठी बिअरच्या फक्त 8 बॉटल्स चोरल्या आहेत.
रवि शंकर मद्यावार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 मे रोजी रात्री 10 ते 5 मेच्या सकाळी 6.30 वाजेदरम्यान देगलूर -नरसी रस्त्यावरील अटकळी शिवारात असलेले त्यांच्या मालकीचे रविकिरण बार रेस्टॉरंट अज्ञात चोरट्यांनी शटर उचकावून तोडले. त्यामध्ये असलेल्या लोखंडी जाळ्यांचे कुलूप तोडले आणि कॅश काऊंटरमधील 20 हजार रुपये रोख रक्कम आणि 8 बिअरच्या बॉटल्स किंमत 1520 रुपयांच्या असा एकूण 21 हजार 520 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. रामतिर्थ पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 132/2025 नुसार केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!