नांदेड(प्रतिनिधी)-मांजरा नदी पात्रात चोरी विक्री करण्याच्या उद्देशाने जमा करून ठेवलेली 150 ब्रास वाळू 9 लाख रुपये किंमतीची सापडली आहे. हुनगुंदा ता.बिलोली या सज्जाचे तलाठी शिवलिंग गोविंद वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हुनगुंदा येथील मांजरा नदी पात्रात सहा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना दि.6 मे रोजी दुपारी 4 वाजेच्यासुमारास जमा करून ठेवलेली वाळू दिसली. ही वाळू चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवण्यात आली होती. या वाळूचे एकूण मोजमाप 150 ब्रास आहे. त्याची किंमत 9 लाख रुपये होते. अज्ञात आरोपींविरुध्द कुंडलवाडी पोलीसांनी गुन्हा क्रमांक 91/2025 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक गजेंद्र मांजरमकर अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 849 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बिअर बार फोडून 20 हजार रुपये रोख रक्कम आणि 8 बिअरच्या बॉटल्या चोरल्या बीसीच्या नावावर 16 लाख 30 हजारांची फसवणुक