नांदेड(प्रतिनिधी)-फेबु्रवारी महिन्यात घेण्यात आलेल्याा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल ऑनलाईन पध्दतीने सोमवारी दुपारी 1 वाजेच्यानंतर परिक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. यात नांदेड जिल्ह्यातून सर्वाधिक उत्तीर्ण होण्याची संख्या मुलींची असल्याने या परिक्षेत मुलींनी बाजी मारल्याचे स्पष्ट दिसून येते.
बारावीच्या परिक्षेसाठी जिल्ह्यातील विविध परिक्षा केंद्रावर कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी शाखा, टीच सायन्स या शाखेतील विद्यार्थ्यांनी परिक्षा दिल्या होत्या. यामध्ये कला शाखेतून 5 हजार 821 मुली, 5871 मुल हे उत्तीर्ण झाले आहेत. एकंदरी कला शाखेचा 81.80 टक्के निकाल लागला आहे. तर वाणिज्य शाखेतून 2 हजार 521 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 1 हजार 340 मुली तर 1 हजार 181 मुल उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा 90.78 टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेतून 21 हजार 915 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 11 हजार 617 मुल तर 10 हजार 298 मुली एकंदरीत 97.45 टक्के विज्ञान शाखेचा निकाल लागला आहे. एमसीव्हीसी शाखेतून 477 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 83.83 टक्के निकाल लागला असून यात 373 मुले आणि 104 मुली उत्तीर्ण झाले आहेत. टीच सायन्समधून 138 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 114 मुले तर 24 मुली या शाखेचा एकूण 75.82 टक्के निकाल लागला आहे. फेबु्रवारी 2025 च्या 12 वी वर्गाच्या परिक्षेसाठी 42 हजार 311 विद्यार्थ्यांनी परिक्षा फार्म भरला होता. यामध्ये मुले 23 हजार 40 तर मुली 19 हजार 271 मुली यांनी अर्ज भरला होता. यापैकी 22 हजार 705 मुले आणि 19 हजार 38 मुली अशा 41 हजार 743 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. यात 19 हजार 351 मुल उत्तीर्ण झाले असून 17 हजार 638 मुले उर्त्तीण झाले आहेत. सरासरी 92.64 टक्के निकाल नांदेड जिल्ह्याचा घोषित झाल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी
