नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मुखेड पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये अवैध रेती वाहतूक करणारा हायवा आणि प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. या मोहिमेत एकूण ३५,५९,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई: अवैध गुटखा विक्री १० जुलै २०२६ रोजी पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मौजे बेऱळी फाटा (ता. मुखेड) येथे एक इसम प्रतिबंधित गुटख्याची विक्री करत आहे. पोलिसांनी पथकासह छापा टाकला असता संभाजी जयवंत शिंदे (वय १९ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. बेळी ता. मुखेड) हा अवैध गुटखा विक्री करताना आणि बाळगताना आढळला. त्याच्याकडून १४,१०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २१३/२०२६ नुसार बी.एन.एस. च्या विविध कलमांसह अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुसरी कारवाई: अवैध रेती वाहतूक दुसऱ्या एका कारवाईत, मौजे बेटमोगरा येथील पेट्रोल पंपासमोर पोलिसांनी विनापरवाना रेती वाहतूक करणारा भारत बेंझ हायवा टिप्पर (क्रमांक TS-15 UE-0444) पकडला. या वाहनात अंदाजे ९ ब्रास लाल रेती मिळून आली. या कारवाईत रेतीची किंमत ४५,००० रुपये आणि हायवा टिप्परची किंमत ३५,००,००० रुपये असा एकूण ३५,४५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी अजित पंढरीनाथ पाटील (रा. देगलूर) यांच्याविरुद्ध गु.र.नं. २१४/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथक ही यशस्वी कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने पार पाडली:
- पोलीस निरीक्षक चिंतांबर कामठेवाड
- पोलीस उपनिरीक्षक गणेश माने
- पोलीस उपनिरीक्षक अभिजीत तुतुरवाड
- पोलीस कॉन्स्टेबल यादव इबितवार (ब.नं. ४०१)
- पोलीस कॉन्स्टेबल शंकर बेलाडे (ब.नं. ११०५)
- पोलीस कॉन्स्टेबल विरभद्र पाटील (ब.नं. ८७०)
- पोलीस कॉन्स्टेबल मन्मथ गौड (ब.नं. ३६६)
- पोलीस कॉन्स्टेबल अमोल सुंडगे (ब.नं. ३२९०)

