नांदेड(प्रतिनिधी)-एका स्टिंग ऑपरेशनमध्ये 500 रुपये राजू गिरीला द्यावे लागतात. तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चॅनेलने त्याला काढून टाकले होते. पुढे इंग्रजी शिकवता शिकवता पत्रकार झालेले गुरुजी संतोष पांडागळे यांच्या पुन्हा एका नव्यान चॅनेलकडे राजू गिरीचा नंबर लागला. त्या ठिकाणी भक्कम पगार असतांना सुध्दा कामगारांच्या पैशांवर हात मारण्याचा प्रकार सुरू झाला. तसेच महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्री मंडळात गृहमंत्री असलेल्या मान्यवराच्या चॅनेलमध्ये हात मारण्याचा प्रयत्न वेगळा सुरू आहे. काही जण सांगतात. त्या ठिकाणी पगार कमी असेल परंतू धंदा मोठा होईल आणि त्यामुळे हात पाय मारणे सुरू आहे.
बीड जिल्ह्यातील दैनिक झुंजार नेता या वृत्तमान पत्राचा स्थानिक प्रतिनिधी म्हणून नांदेडमध्ये सुरूवात केलेल्या राजू गिरीने आपल्या जीवनात एवढ्या मोठ्या घटना घडविल्या आहेत की, त्या घटना लिहिता-लिहिता आम्हाला जागा पुरणार नाही. पण पुढे वृत्तवाहिन्यांचे चलन आले. काही दुसऱ्या पत्रकारांच्या मदतीने आपल्या बापाला एका चॅनलमधून कमी करून ती जागा बळकावली. त्या चॅनलमध्ये तर एवढा जम बसविला की, प्रत्येक जण तोच चांगला व्यक्ती आहे असे सांगू लागला. काही काळानंतर एका तालुक्याच्या वार्ताहरासोबत केलेल्या स्टींग ऑपरेशमध्ये तो वार्ताहर सांगत होता की, 1000 रुपये बातमीसाठी द्यावे लागतात. त्यातील 500 रुपये राजू गिरीला आणि 500 रुपये मला मिळतात. हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि वास्तव न्युज लाईव्हने त्याची बातमी पण तयार केली. त्यानंतर राजू गिरीला जेथे मारायची तेथे त्या चॅनलने लाथ मारली. मग रस्त्यावर आले.
रस्त्यावर आल्यानंतर इंग्रजी शिकवता शिकवता पत्रकार झाले आणि राजकीय नेते बनले. सध्या नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे यांच्या आशिर्वादाने त्यांना स्थानिक चॅनलमध्ये जागा मिळाली. त्या ठिकाणी असलेल्या कामगारांवर सुध्दा धंदा करायचा धंदा राजू गिरीने सुरू केला. उदाहरणार्थ एखादा कामगार एका महिन्यात 2-3 दिवस आला नसेल तर त्याचा हिशोब ठेवला गेला आणि पगार देतांना कार्यालयाकडून तर पगार पुर्ण घेतली पण दोन-तीन दिवस कमी आलेल्या पत्रकाराचे पैसे कापून ते पैस संतोषमध्ये उडवून टाकले. जीवनात संतोष हा खुप मोठा आनंद राजू गिरीसाठी आहे. पण आपण कितीही वाईट केले तरी ते कोठे तरी उघड होत असते. याची जाणिव मागच्या उदाहरणावरुन सुध्दा राजू गिरी शिकला नाही. असो जैसी करणी वैसी भरणी. हा न्याय त्यांच्यासाठी सुध्दा आहेच.
नवीन चॅनलने अद्याप अधिकार दिले नसतांना सुध्दा त्यात काम करणाऱ्या छोट्या छोट्या पत्रकारांना त्रास देण्याचा धंदा वेगळा आहे. काही जुने पत्रकार सुध्दा आता राजू गिरीच्या नादाला लागले आहेत. पण त्यांना हे कळत नाही की, कधी याच्यामुळेच आमचा धंदा सुध्दा उघड पडला तर आमचे काय होईल. खरे तर वय वाढल्यानंतर नवीन लोकांना स्फुर्ती देणे हे जेष्ठांचे काम असते. परंतू नागपूरी ज्येष्ठाच्या शिकवणीत शिकलेला राजू गिरी मात्र नवीन पत्रकारांना त्रास देण्यातच धन्यता मानतो. अशा प्रकारे हा दाबल्या जाण्याचा प्रकार एखाद्या दिवशी ज्वालामुखीसारखा उद्रेक करणार नाही याची काहीच शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिकमध्ये भरपूर मोठी पगार घेवून काम करतांना सुध्दा महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्री मंडळातील मान्यवर व्यक्तीच्या वृत्तवाहिनीमध्ये जाण्यासाठी भरपूर जोरदार प्रयत्न नागपूरी काकाच्या मदतीने सुरू आहेत. याचे कारण असे आहे की, वृत्तवाहिनीमध्ये पगार कमी असेल परंतू तेथे केला जाणारा धंदा मात्र मोठा असतो. हा धंदा नांदेडमध्ये फक्त राजू गिरीलाच चांगला जमतो. इतर वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना आपल्या काखेत धरुन राजू गिरी हा धंदा चालवितो. आम्ही हा धंदा सुरू असा किंवा नाही केला जावा याचे उत्तर देण्याची जबाबदारी वाचकांवर सोडत आहोत.
गुरूजीच्या आशिर्वादाने राजाचा भिकारचोटपणा सुरूच…
