नांदेड(प्रतिनिधी)-आलेगाव उत्तर शिवारात भुईमुग निंदण्याच्या कामासाठी गुंज ता.वसमत येथून आणलेल्या मजुरांपैकी 7 महिलांचा मृत्यू ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यामुळे झाला आहे. या ट्रॅक्टर चालकासह चार पुरूष जखमी आहेत.

आज सकाळी 6.30 ते 7 वाजेदरम्यान वसमत तालुक्यातील गुंज येथून एका ट्रॅक्टरमध्ये 7 महिला आणि 3 पुरूष असे कामगार आणले होते. पण हे ट्रॅक्टर आलेगाव उत्तर या भागातून ट्रॅक्टर बाहेर काढण्यास काही तरी चुक झाली आणि ते ट्रॅक्टर हेडसह 70 फुट विहिरीत कोसळले.
यामध्ये मरण पावणाऱ्या महिलांची नावे ताराबाई सटवाजी जाधव (35), धुरपदा सटवाजी जाधव (28), सरस्वती लखन बुरड(25) सिमरण संतोष कांबळे(18), चऊत्राबाई माधव पारधे (45), ज्योती इरबाजी सरोदे (35) आणि सपना तुकाराम राऊत अशी आहेत. या घटनेतील तीन पुरूष कामगार आणि ट्रॅक्टर चालक जखमी आहेत अशी माहिती सांगण्यात आली. लिंबगावा पोलीस, आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी धावले. त्यांनी जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले आहे.
