नांदेड :- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयावर हल्ला करणाऱ्या गुंडांचा ताबडतोब बंदोबस्त करा. त्यांच्यावर कोठोरातील कठोर कारवाई करा अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मागणीचे निवेदन जिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आले आहे.
पारंपरिक अज्ञान आणि अंधश्रद्धेचा अंधार चिरून प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिन , दलित, शोषित , पीडित , वंचित , मागासवर्गीयांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पोहोचवण्यासाठी शैक्षणिक संस्था उभारल्या.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी त्यांची शैक्षणिक संकुल उभी आहेत. या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून असंख्य अधिकारी व कर्मचारी घडले आहेत. अशा पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात रीपाई आठवले गटाच्या काही गुंडानी धुडघुस घातला. यावेळी कार्यालयातील मुख्य कॅबिनची तोडफोडे करण्यात आली. त्यामुळे हा हल्ला करणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांनी केले आहे.
