नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अंमलदार अनेकदा पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रतिनियुक्तीवर असतात. प्रतिनियुक्तीवर असतांना त्यांची पदोन्नती झाली तर त्यांचे पदोन्नती झाल्यावर त्यांचे पद रिक्त नाही म्हणून त्यांना त्यांच्या मुळ घटकात परत पाठविण्यात येते असे न करण्याबाबत सुचना देणारे पत्र प्रशिक्षण व खास पथके कार्यालयाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी जारी केले आहे.
राज्यात सर्व पोलीस प्रशिक्षण संस्थामध्ये विविध घटकांमधून पोलीस कर्मचारी प्रतिनियुक्तीवर काम करण्यासाठी जातात. बहुतांश वेळी मुळ घटकात संबंधीत पोलीस कर्मचाऱ्याची त्याच्या भरती झालेल्या बॅच सोबत पदोन्नती होते. पण ते पदोन्नतीवरील पद पोलीस प्रशिक्षण केंद्रात रिक्त नसते. म्हणून त्या कर्मचाऱ्यांना परत त्यांच्या मुळ घटकात पाठविण्यात येते. ही कार्यवाही प्रशासकीय दृष्ट्या अयोग्य आहे.
या पत्रात सर्व पोलीस प्रशिक्षण केंद्रांच्या प्राचार्यांना निर्देशीत करण्यात आले आहे की, पदोन्नती प्राप्त पोलीस कर्मचाऱ्यांना परत त्यांच्या मुळ घटकात पाठवू नये. पदोन्नती प्राप्त पोलीस कर्मचाऱ्याला जेंव्हा पदोन्नती मिळते तेंव्हा त्यावेळी त्याच्या लगतचा सेवा कनिष्ठ कर्मचारी उच्च पदाचे वेतन स्विकारतो. म्हणून पदोन्नती प्राप्त कर्मचारी सुध्दा ते वेतन प्राप्त करण्यास पात्र असतो. आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत विहित कालावधीत पदोन्नती मिळाली नाही तर पोलीस कर्मचारी वरिष्ठ पदाचे वेतन घेण्यास पात्र ठरतात. यावेळी वरिष्ठ पद रिक्त नसेल तरी त्याला वरिष्ठ पदाचे वेतन दिले जाते. भविष्यात योग्य कार्य पध्दतीचा अवलंब करून पोलीस प्रशिक्षण संस्थांमध्ये रिक्त पदांची संख्या जास्त आहे. जे कर्मचारी इच्छूक आहेत. त्यांना टिकविणे गरजेचे आहे. चुकीच्या कार्यपध्दतीचे पालन करून रिक्त पदांची संख्या वाढवू नये. या पुढे कोणत्याही कर्मचाऱ्यास मुळ घटकात परत करण्यापुर्वी अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके या कार्यालयाची पुर्व मान्यता घेणे बंधनकार करण्यात आलीे आहे.