नांदेड(प्रतिनिधी)-वाजेगाव येथील लातूरफाटा येथून दारुची दोन दुकान बंद करून घरी गेल्यानंतर ती दुकानफोडून चोरट्यांनी विदेशी दारु व रोख रक्कम असा 1 लाख 74 हजार 782 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अजय नागोराव डोंगरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 नोव्हेंबरच्या रात्री 10 वाजता ते आपली रुबी वाईन्स ही दुकान बंद करून घरी गेले. 25 नोव्हेंबरच्या सकाळी 10 वाजता परत आले तेंव्हा पवार यांच्या देशी दारु दुकानातील 85 हजार रुपये रोख रक्कम व रुबी वाईन शॉपमधील 25 हजार 830 रुपयांची दारु व 89 हजार 722 रुपये रोख रक्कम असा दोन्ही दुकानातील 1 लाख 74 हजार 782 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या दोन दुकानात झालेल्या चोरीचा एक गुन्हा क्रमांक 1102/2024 नांदेड ग्रामीण पोलीसांनी दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गायकवाड हे अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 896 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अर्धापूरमध्ये सोन्याच्या व्यापाऱ्यावर हल्ला करून 5 लाख 53 हजारांचा डाका Semaglutide Online Kopen: Veilig en Betrouwbaar