नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांनी अवैधरित्या विक्रीसाठी आणलेल्या 72 तलवारी, 9 खंजीर आणि 15 धार-धार भाल्याचे टोक असे एकूण 96 धार-धार आणि घातक शस्त्र जप्त केले आहेत. या साहित्याची किंमत 1 लाख 72 हजार 50ं0 रुपये आहे.
वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम, सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत लोंढे, चिम्मा बोईने, पोलीस उपनिरिक्षक वशिष्ट बिकड, पोलीस अंमलदार मठपती, शरदचंद्र चावरे, रमेश सुर्यवंशी, शेख इमरान, भाऊसाहेब राठोड, अंकुश पवार आदींनी उदासी मठासमोर 11 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजता तपासणी केली. तेथे रा.दर्शनसिंघ लाभसिंघ (32) रा.भटींडा जि.पंजाब यांच्या ताब्यातून 72 तलवारी, 9 खंजीर, 15 धार-धार भाल्याचे टोक असा एकूण 96 धार-धार आणि घातक शस्त्रांचा साठा पकडला. परमेश्र्वर कदम यांच्या तक्रारीवरुन दर्शनसिंघ लाभसिंघ विरुध्द वजिराबाद पोलीसांनी भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा क्रमांक 544/2024 दाखल केला आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक कृतिका आदींनी वजिराबाद पोलीसांचे कौतुक केले आहे.