नांदेड, दि. 2 मार्च :- भारत सरकार, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय यांचेकडून प्राप्त पत्रानुसार आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “अस्मिता महिला लीग” आयोजनासंबंधी मानक कार्यपद्धती निर्गमित करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने नांदेड जिल्हयामध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरण, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, खेलो इंडिया, माय भारत, युवा कार्य, क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विदयमाने व सायन्स कॉलेज, नांदेड यांच्या सहकार्याने 8 मार्च, 2026 रोजी “अस्मिता महिला लीग” स्पर्धाचे आयोजन सायन्स कॉलेज, नांदेड करण्यात आले आहे. या स्पर्धेचा मुख्य उददेश म्हणजे महिला खेळाडूंना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, क्रीडा सहभाग वाढविणे व स्थानिक स्तरावर क्रीडा चळवळ बळकट करणे, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणाचा संदेश देणे, जिल्हास्तरावर क्रीडा संरचना व तांत्रिक क्षमता विकसित करणे हा आहे. स्पर्धेची रचना क्रीडा प्रकारः अॅथलेटिक्स प्रस्तावित स्पर्धाः अ) धावण्याच्या स्पर्धा :100 मीटर, 200, 400 मीटर याबाबीचा समावेश असून यामध्ये वयोगटः 13 वर्षाखालील, 13 ते 18 वर्षे, 18 वर्षांवरील मुली व महिलांचा समावेश राहील. वय पडताळणी नोंदणीच्या वेळी पुढील कागदपत्रांच्या आधारे वय निश्चित करण्यात येईल 1) आधारकार्ड (प्राधान्याने), 2) राज्य/केंद्र शासनाने दिलेला जन्म तारीख नमूद असलेला पुरावा, 3) दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र इत्यादी नोंदणी दरम्यान खेळाडूंचे वय, वजन व उंची नोंदविणे आवश्यक राहील. यासाठी नांदेड जिल्हयातील मुली व महिला खेळाडूंनी ASMITA Portal वर आपली नांवे 07 मार्च, 2026 पर्यंत आवश्यक कागदपत्रासह अपलोड करणे बंधनकारक आहे. यामध्ये पहिला, दुसरा व तिसऱ्या विजेत्या खेळाडूंना मेडल देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. तरी नांदेड जिल्हयातील 13 वर्षांखालील, 13 ते 18 वर्षे, 18 वर्षांवरील मुली व महिलां खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने अस्मिता पोर्टलवर आपली नांवे अपलोड करावी व 08 मार्च,2026 रोजी सकाळी 7.30 वा. सायन्स कॉलेज, नांदेड येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी श्रीमती शिवकांता देशमुख (राज्य क्रीडा मार्गदर्शक) 9657092794 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 620 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation २० वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, नांदेड येथे क्रांतिकारी रॅपची दमदार सुरुवात ‘आयोग आपल्या दारी’ नांदेड येथे द्वितीय अपीलांचा विशेष अपील निर्गत कार्यक्रम 9 ते 13 मार्च दरम्यान