नांदेड – राज्य माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांच्या संकल्पनेतून ‘आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नांदेड येथे द्वितीय अपीलांचा विशेष अपील निर्गत कार्यक्रम 9 ते 13 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. राज्य माहिती आयोग, छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडे माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 19 (3) अंतर्गत प्रलंबित द्वितीय अपीलांचा शिघ्र निपटारा व्हावा तसेच अपीलार्थी, जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या वेळेची बचत व्हावी, या उद्देशाने नांदेड जिल्ह्याशी संबंधित द्वितीय अपीलांची सुनावणी नांदेड मुख्यालयी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सन 2024 व सन 2025 या कालावधीत आयोगाकडे सादर करण्यात आलेली व अद्याप प्रलंबित असलेली नांदेड जिल्ह्यातील एकूण 1136 द्वितीय अपीलांची सुनावणी या विशेष कार्यक्रमांतर्गत मा. राज्य माहिती आयुक्त, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ यांचेसमोर होणार आहे. ही सुनावणी 9 ते 13 मार्च 2026 दरम्यान कॅबिनेट हॉल, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. सर्व संबंधितांना आयोगाकडून सुनावणी नोटीस पोस्टाने पाठविण्यात आलेल्या आहेत. तसेच सुनावणी बोर्ड (वादसूची) आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. संबंधित अपीलार्थींनी www.sic.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपल्या अपील क्रमांकानुसार सुनावणीची तारीख व वेळ तपासून सुनावणीस व्यक्तिशः उपस्थित राहावे, असे आवाहन आयोगाचे उपसचिव रा. चो. सरवदे यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 721 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “अस्मिता महिला लीग” आयोजनात सहभागी होण्याचे आवाहन भारताच्या शेअर मार्केट मधून आज सकाळी ५ सेकंदात ८ लाख कोटी गायब झाले