नांदेड -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला स्वाभिमान आणि निळ्या झेंड्याखाली एक होत नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रा. राजू सोनसळे यांनी आज रिपब्लिकन सेनेच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महात्मा फुले पुतळ्यापासून काढण्यात आलेल्या रॅलीत असंख्य भिमअनुयायी सहभागी झाले होते.
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रा. राजू सोनसळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी आंबेडकर नगर येथील बुद्ध विहारावर राजू सोनसळे यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी आंबेडकर नगरसह नांदेड महानगरातील आंबेडकरी नगरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. आमचा स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल तर आणि निळ्या झेंड्याची ताकद दाखवून द्यायचे असेल तर प्रा. राजू सोनसळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असा एकमुखी आवाज यावेळी बुलंद करण्यात आला. लढेंगे भाई जितेंगे … नांदेड लोकसभा जितेंगे.. अशा घोषणांनी शहर दणाणले.
काढण्यात आलेल्या नामांकन रॅलीत राहुल चिखलीकर , रुपेश सोनसळे , आकाश वाघोळे , शुभम दुधमल ,चंद्रकांत धोत्रे , रितेश राऊत , रुपेश केळकर, कशिश वाघोळे , साहिल गच्चे , राजू आठवले , अमर जोंधळे, धम्मपाल लांडगे, महेश पंडित, मंगेश खंडागळे , ज्ञानेश्वरी केंद्रे , गीताबाई , सीमा गोडबोले , वंदना मिसळ, शोभा कांबळे , वनिता जोंधळे, निकिता लोखंडे , दैवशाला नरवाडे , शीला वाघमारे ,पूजा वाघमारे, नंदिनी सरोदे यांचे सह अनेकांची उपस्थिती होती.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील लोकशाही निर्माण करायचे असेल तर होऊ घातलेल्या नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत रिपब्लिकन सेनेला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे उमेदवार प्रा. राजू सोनसळे यांनी यावेळी केले.