नांदेड(प्रतिनिधी)-मुंबई शहरातून 111 पोलीस निरिक्षकांच्या बदल्या राज्यातील इतर ठिकाणी करण्यात आल्या आहेत. विशेष करून मुंबईच्या क्राईम ब्रॅंचमधील बरेच अधिकारी काढून टाकण्यात आले आहेत. निवडणुक आयुक्तांनी दिलेल्या सल्यानंतर या बदल्या करण्यात आल्या आहेत. सोबतच सोलापूर, रायगड, ठाणे शहर, नंदुरबार, सिंधदुर्ग या जिल्ह्यातून 11 पोलीस निरिक्षकांना मुंबई शहरात पाठविण्यात आले आहे. हे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक के.एम.मल्लीकार्जुन प्रसन्ना यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे. परंतू राज्यातील बऱ्याच पोलीस परिक्षेत्रांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलीस महासंचालक कार्यालयाने केल्यानंतर सुध्दा त्यांना अद्याप बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आलेले नाही.
मुख्य निवडणुक आयुक्त राजीवकुमार आणि त्यांचे दोन सहकारी निवडणुक आयुक्त मुंबई दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर आवश्यक असलेल्या बदल्या केल्या नाहीत. याबद्दल विचारणा केली असता जवळपास 100 पेक्षा जास्त पोलीस निरिक्षकांना निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार बदल्या झालेले नव्हत्या. त्याबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर पोलीस महासंचालक कार्यालयाने 4 ऑक्टोबर रोजी रात्री मुंबई शहरातील 111 पोलीस निरिक्षकांना मुंबई बाहेरच नव्हे तर बऱ्याच दुरपर्यंत नविन नियुक्त्या दिल्या आहेत. तसेच राज्यातील 11 पोलीस निरिक्षकांना नवीन बदली देवून त्यांना मुंबई शहरात बोलावण्यात आले आहे.
केंद्रीय निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार पोलीस महासंचालक कार्यालयाने या बदल्या केल्या आहेत. पण 6 महिन्यापुर्वी पोलीस महासंचालक कार्यालयाने केलेल्या बदल्यांमधील बरेच अधिकारी आजही त्याच जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्या अधिकाऱ्यांना का नवीन नियुक्तीच्या ठिकाणी सोडले नाही याची विचारणा पोलीस महासंचालक कार्यालयाने करायला हवी. कारण केंद्रीय निवडणुक आयोग महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे गणित तपासू शकत नाही. त्याची महत्वाची जबाबदारी परिक्षेत्रांच्या अधिकाऱ्यांवर असते की, आपल्या परिक्षेत्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पोलीस महासंचालकांनी बदल्या केलेले कोणते अधिकारी अजून नवीन नियुक्त्या ठिकाणी गेले नाहीत, का गेले नाहीत हे पाहुन त्यांना योग्य सुचना करायला हव्या.
मुंबई शहरातून बाहेर बदल्या झालेल्या 111 पोलीस निरिक्षकांची पीडीएफ संचिका वाचकांच्या सोयीसाठी जोडली आहे. तसेच दुसरी पीडीएफ संचिका राज्याच्या इतर ठिकाणावरून 11 पोलीस निरिक्षकांना मुंबईमध्ये बोलावले त्यासंदर्भाची आहे.