नांदेड(प्रतिनिधी) -विधानसभा निवडणुका जाहीर होवून प्रक्रिया पुर्ण होण्यामध्ये 50 दिवस शिल्लक असतांना राज्य शासनाच्या प्रशासन विभागाने अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यास मान्यता दिली आहे.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव डी.बी.मोरे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेलेल्या महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने 1 ऑक्टोबर 2024 रोजी मान्यता दिल्यानंतर 4 ऑक्टोबर 2024 रोजी राज्य शासनाने अहमदनगर तालुका व जिल्ह्याचे नाव आहिल्यानगर केले आहे. या बदलाची संबंधीतांनी नोंद घ्यावी असे या राजपत्रात नमुद आहे. निवडणुकांच्या पार्श्र्वभूमीवर केलेला हा नावातील बदल सध्याच्या राज्य शासनाला किती उपयोगाचा आहे हे विधानसभा निवडणुकांचा निकाल आल्यानंतर तसेच त्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील जनतेने दिलेल्या कौलानंतर समोर येईल.