नांदेड(प्रतिनिधी)- नांदेडमध्ये ईद ए-मिलादुन्नबी निमित्त रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. ईद ए-मिलादुन्नबी मिरवणुकीच्या निमित्ताने शहरातील आयुर्वेदिक आणि शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना विविध फळांचे किट्स देण्यात आले. हा सामाजिक उपक्रम ‘राहत एज्युकेशन सोशल वेल्फेअर अँड कल्चरल सोसायटी’च्या वतीने राबवण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश ईद ए-मिलादुन्नबी निमित्ताने मानवतावादी संदेश पसरविणे हा होता. या वेळी सोसायटीचे अध्यक्ष हैदर अली, उपाध्यक्ष शेख खालिद, सचिव सय्यद वसीम, सहसचिव मोहम्मद अलीम, खजिनदार झुल्फिकार अहमद आणि सदस्य शेख फसीहुद्दीन, रऊफ खान, शेख फिरोज, शेख अजर उपस्थित होते. सोसायटीच्या आयोजकांनी सांगितले की, अशा प्रकारच्या उपक्रमांचा उद्देश समाजात ऐक्य, बंधुता आणि गरजूंच्या मदतीला प्रोत्साहन देणे हा आहे. Kanthak Suryatal Post Views: 667 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिल्हास्तरीय शालेय लॉन टेनिस क्रिडा स्पर्धेत अपूर्वा रोकडे जिल्ह्यात प्रथम ई-पीक नोंदणीसाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक