नांदेडमध्ये चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; इतवारा पोलिसांत तक्रार नांदेड (प्रतिनिधी) – मोटारसायकल घासल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची घटना नांदेड शहरातील रेहमतनगर परिसरात घडली. चौघांनी संगनमत करून दोघांवर तलवार व खंजीराने हल्ला केल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास रेहमतनगर येथील उमर मटन दुकानासमोर हा प्रकार घडला. करीमखान गौसखान, अबू जलीलखान गौसखान, असलमखान गौसखान आणि अमनखान गौसखान (सर्व रा. रेहमतनगर, नांदेड) यांनी मोटारसायकल घासल्याच्या कारणावरून फिर्यादी व त्यांचा मित्र सोहेल खान यांच्याशी वाद घातला. या वादातून चौघांनी संगनमत करून जिवे मारण्याच्या उद्देशाने तलवार व खंजीराने मारहाण केली. या हल्ल्यात सोहेल खान गंभीर जखमी झाला. या प्रकरणी शेख जमीर शेख जावेद (वय २८, रा. रेहमतनगर, नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), ३५२, ३५१(२), ११५(२) व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर देशमुख करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 11 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मानसिक त्रासाला कंटाळून ४२ वर्षीय व्यक्तीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल