ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी नांदेड (जिमाका) – राज्यातील अपुऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या निवारणासाठी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने सामाजिक बांधिलकी जपत नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांचे सप्टेंबर 2026 मधील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. या सामाजिक बांधिलकीच्या निर्णयाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कौतुक करून तलाठी संघाचे अभिनंदन केले आहे. राज्यातील अनेक भागांत अपुऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या काळात ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संवर्ग शासनाच्या निर्देशानुसार दुष्काळ निवारणाच्या विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत आहे. दुष्काळग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासन व प्रशासनाच्या प्रयत्नांना सामाजिक बांधिलकीची जोड देत महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयातून आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी महसूल संवर्गाची सामाजिक बांधिलकी आणि शासनासोबतची कार्याची भूमिका अधोरेखित होत आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजीच्या निवेदनानुसार, नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांचे सप्टेंबर 2026 च्या वेतनातून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासोबत सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका घेत केलेल्या या योगदानाबद्दल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महाराष्ट्र राज्य तलाठी संघ तसेच जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 53 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात शौर्यदिन उत्साहात साजरा नांदेडमध्ये ४ ऑक्टोबरला रंगणार वंदे मातरम् महोत्सव २०२६