शौर्यदिनानिमित्त वीरनारी, वीरमाता-पिता व माजी सैनिकांचा सत्कार सर्जिकल स्ट्राईकच्या शौर्याचे केले स्मरण नांदेड (जिमाका) – येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 29 सप्टेंबर रोजी शौर्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्ह्यातील वीरनारी, वीरमाता-पिता तसेच माजी सैनिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. (निवृत्त) कर्नल राहुल माने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ईसीएचएस नांदेडचे कर्नल एस. जॉन रस्किन (निवृत्त) होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाचे चंद्रकांत कारभारी उपस्थित होते. भारतीय माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सार्जंट रामराव थडके, सैनिक फेडरेशन मराठवाड्याचे अध्यक्ष लक्ष्मण देवदे यांच्यासह 3 वीरनारी, 1 वीर पिता आणि विविध लष्करी मोहिमांमध्ये सहभागी झालेले माजी सैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कल्याण संघटक ऑ. कॅप्टन बळीराम गिराम (निवृत्त) यांनी प्रास्ताविकातून शौर्यदिनाचे महत्त्व विशद केले. भारतीय सशस्त्र दलाने 29 सप्टेंबर 2016 रोजी नियंत्रण रेषेपलीकडे दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या शौर्यपूर्ण कारवाईचे स्मरण यावेळी करण्यात आले. 18 सप्टेंबर 2016 रोजी जम्मू-काश्मीरमधील उरी येथे लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाच्या संरक्षणासाठी योगदान देणाऱ्या माजी सैनिकांच्या शौर्याला आणि त्यागाला अभिवादन करण्यात आले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. (निवृत्त) कर्नल राहुल वैजनाथ माने यांनी उपस्थित सर्व माजी सैनिकांना शौर्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सार्जंट रामराव थडके (निवृत्त), अर्जुन जाधव, अनिल देवज्ञे, सूर्यकांत कदम, माधव कल्याणकर आणि नायब सुभेदार गंगाधर हटकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप वसतिगृह अधीक्षक सुबेदार अर्जुन जाधव (निवृत्त) यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. Kanthak Suryatal Post Views: 39 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ठाकरे सेनेच्या निष्ठावंतांचा सन्मान केला जाईल – संपर्कप्रमुख किशोर पोद्दार