नांदेड जिल्ह्यास २४ एक्सपेलर यंत्रांचा लक्षांक; वैयक्तिक शेतकरी व एफपीओंना मिळणार अनुदान नांदेड (जिमाका) – राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) योजनेंतर्गत मिनी ऑईल मिल-एक्सपेलर फिल्टर प्रेससह तसेच मिनी ऑईल मिल-एक्सपेलर फिल्टर प्रेस शिवाय या घटकांची अंमलबजावणी कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत महाडीबीटी पोर्टलवर लाभार्थी निवडीसाठी सादर करण्यात आलेल्या अर्जांमधून शेतकरी उत्पादक कंपनी व संस्था यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. लक्षांक शिल्लक राहिल्यास वैयक्तिक लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यास या घटकासाठी एकूण २४ एक्सपेलर यंत्रांचा लक्षांक प्राप्त झाला आहे. यामध्ये मिनी ऑईल मिल/एक्सपेलर फिल्टर प्रेससह घटकासाठी जिल्ह्यास १२ यंत्रांचा लक्षांक असून, प्रति युनिट कमाल अनुदान मर्यादा ४ लाख रुपये आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प/सीमांत व महिला प्रवर्गातील लाभार्थ्यांना युनिटच्या किमतीच्या ५० टक्के किंवा निर्धारित कमाल मर्यादेपर्यंत, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना युनिटच्या किमतीच्या ४० टक्के किंवा निर्धारित कमाल मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. तसेच मिनी ऑईल मिल/एक्सपेलर फिल्टर प्रेस शिवाय या घटकासाठी जिल्ह्यास १२ यंत्रांचा लक्षांक असून, प्रति युनिट कमाल ३ लाख रुपये अनुदान मर्यादा आहे. या घटकासाठीही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प/सीमांत व महिला प्रवर्गातील लाभार्थ्यांना युनिटच्या किमतीच्या ५० टक्के किंवा निर्धारित कमाल मर्यादेपर्यंत, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ४० टक्के किंवा निर्धारित कमाल मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर ‘प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असल्याने इच्छुक वैयक्तिक शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी विलंब न करता https://mahadbt.maharashtra.gov.in/ Farmer/AgriLogin या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 249 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा जनसंवाद ; लातूरमध्ये २३ तक्रारदारांशी थेट संवाद दोन आरोपी अटकेत; रोख रक्कम व दुचाकीसह ७९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त