नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी व दुकानफोडीच्या दोन स्वतंत्र चोरीच्या गुन्ह्यांचा नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाने छडा लावला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ७९ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ७३३/२०२६ मध्ये १८ जून २०२६ रोजी फिर्यादी कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटाचे कुलूप तोडून त्यातील ५० हजार रुपये रोख चोरून नेण्यात आले होते. या प्रकरणी BNS कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११४९/२०२६ दाखल करण्यात आला होता. ६ सप्टेंबर रोजी दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी २३ हजार ५०० रुपयांची चोरी केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून उपलब्ध पुरावे व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी इरफान खान नसरत खान पठाण (वय २५) आणि अनुराग विठ्ठल पाटील (वय १८), दोघेही रा. वाजेगाव, नांदेड यांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत दोन्ही चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. आरोपींकडून ९ हजार ४०० रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली अंदाजे ७० हजार रुपये किमतीची प्लॅसर मोटारसायकल, असा एकूण ७९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींचा इतर चोरीच्या गुन्ह्यांत सहभाग आहे का, याबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे व नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथक तसेच सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांनी केली. Kanthak Suryatal Post Views: 124 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत मिनी ऑईल मिल व एक्सपेलर फिल्टर प्रेससाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन भोकर-नांदेड रस्त्यावर भीषण अपघात; ६ ठार, ८ जखमी