भोकर (प्रतिनिधी) -भोकर ते नांदेड मार्गावरील सिताखंडी परिसरात गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास ट्रक आणि मॅजिक वाहनाची भीषण धडक होऊन ६ जणांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमींना उपचारासाठी नांदेड येथील विविध खासगी व शासकीय खासगी रुग्णालयांत हलविण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मॅजिक वाहन क्रमांक एमएच २६ ए.के. ०५४८ हे नांदेडहून भोकरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी ट्रक क्रमांक एपी २९ पीए ८१२९ हा भोकरकडून नांदेडकडे येत होता. सिताखंडी परिसरात दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की, मॅजिक वाहनातील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या अपघातात पांडूरंग लिंगुजी वाघमारे (५५), यांची पत्नी लक्ष्मीबाई पांडुरंग पवार रा. सय्यदनगर, भोकर व त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच शेख फेरोज (३०), रा. बिलालनगर, भोकर आणि शेख अलतमेश शेख अलीमोद्दीन (२५), रा. बिलालनगर, भोकर, बलवान पवार राहणार पोटा तांडा यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. अन्य एक मृतांचे नावे अद्याप समजू शकले नाही.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. मृतांची व जखमींची अधिकृत माहिती तसेच अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. Kanthak Suryatal Post Views: 751 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दोन आरोपी अटकेत; रोख रक्कम व दुचाकीसह ७९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त देवणीतील रानमाळा जुगार क्लबवर डीआयजी पथकाचा छापा; १२.७० लाखांचा मुद्देमाल जप्त