नांदेड(जिमाका) – भटके-विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली विविध शासकीय प्रमाणपत्रे सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी हस्सापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राथमिक आश्रमशाळा तसेच जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 31 ऑगस्ट हा भटके-विमुक्त दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांना क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे समग्र वाङ्मय हा ग्रंथ भेट देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग काकडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार (महसूल) सुनील माचेवाड उपस्थित होते. याप्रसंगी प्राध्यापक, लेखक व कवी अशोक कुबडे यांनी भटके-विमुक्त जमातीचा इतिहास, सामाजिक परिस्थिती, शैक्षणिक प्रगती तसेच विद्यार्थ्यांसमोरील विविध संधी व आव्हाने याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध संधींचा लाभ घेऊन आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. नायब तहसीलदार सुनील माचेवाड यांनी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रासह आवश्यक विविध शासकीय प्रमाणपत्रे मिळविण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच शासकीय सेवा व योजनांचा लाभ घेण्यासाठी करावयाची कार्यवाही याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्राचे चालक गणेश मॅकल यांच्या माध्यमातून आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रमाणपत्रे काढताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर होऊन शासकीय प्रक्रियेत सुलभता निर्माण होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एस. एल. गायकवाड तसेच प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व्ही. आर. कदम यांचे सहकार्य लाभले. श्रीमती एस. एस. शेळके यांनी स्वागतगीत सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डी. आर. कळसे यांनी केले. Kanthak Suryatal Post Views: 293 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महापालिकेत मोठी कारवाई: कार्यालयीन वेळेत गैरहजर असणार्या 54 कर्मचार्यांना कारणे दाखवा नोटीस! तोटंबा येथे अपघात होऊन मरण पावलेल्या तीन व्यक्तींच्या मृत्यूचा खरा जबाबदार कोण?