कुंडलवाडी (प्रतिनिधी) : -कुंडलवाडी येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ४८ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
नरागल्ली, कुंडलवाडी येथील रहिवासी ललिता लालू तोंदलवार यांच्या घरात २५ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान ही घरफोडी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
या प्रकरणी ललिता तोंदलवार यांच्या फिर्यादीवरून कुंडलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि मांजरमकर पुढील तपास करीत आहेत.
