पोलिसांच्या गणवेशातील अधिकाऱ्याची भीती दाखवत सायबर ठगांनी लुटले; तपास सुरू नांदेड (प्रतिनिधी):- शहरातील श्रीनगर परिसरात सायबर ठगांनी पोलिसांच्या गणवेशातील अधिकाऱ्याच्या नावाचा गैरवापर करून एका व्यक्तीला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत तब्बल 31 लाख 20 हजार 200 रुपयांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 ते 25 ऑगस्ट 2026 या कालावधीत हा प्रकार घडला. आरोपी अमनकुमार शर्मा व संदीपराव यांनी संगनमत करून फिर्यादीशी व्हॉट्सॲप कॉलद्वारे संपर्क साधला. आपण पोलिसांच्या गणवेशातील अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादीला विविध कारणे सांगण्यात आली. त्यानंतर डिजिटल अरेस्टची भीती दाखवत ऑनलाइन पद्धतीने पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले. आरोपींच्या दबावाला बळी पडलेल्या फिर्यादीने वेगवेगळ्या व्यवहारांतून एकूण 31,20,200 रुपये ऑनलाइन पाठविल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून सायबर गुन्हा रजिस्टर क्रमांक 15/2026 नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक वसंत सप्रे करीत आहेत. ऑनलाइन फसवणुकीच्या या प्रकारामुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या फोन, व्हॉट्सॲप कॉल किंवा व्हिडिओ कॉलवर विश्वास ठेवू नये, तसेच पोलिस अथवा कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे मागितल्यास तत्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 640 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कुंडलवाडीतील घरफोडीत १.४८ लाखांचा ऐवज लंपास घरच्या सुरक्षित भिंतीही असुरक्षित! टीव्ही पाहणाऱ्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला १० वर्षांची सक्तमजुरी; नांदेड न्यायालयाचा विदारक वास्तवावर चपराक देणारा निकाल