नांदेड(प्रतिनिधी): -उधारीवर किराणा सामान देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका तरुणाने किराणा दुकानदाराला शिवीगाळ करून थापड-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शहरातील जयभीमनगर परिसरात घडली. यावेळी आरोपीने दुकानदाराच्या खिशातील पैसे काढून घेत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ७ वाजता जयभीमनगर, नांदेड येथे आरोपी निहान ऊर्फ शेठ्टी विनायक पाईकराव (वय २८) हा फिर्यादीच्या किराणा दुकानात आला. त्याने उधारीवर किराणा सामान मागितले. मात्र, फिर्यादीने उधारीवर सामान देण्यास नकार दिल्याने आरोपी संतापला. यानंतर आरोपीने फिर्यादी सुजित आनंदाराव नवघडे (वय ४०, रा. जयभीमनगर, नांदेड) यांना शिवीगाळ करत थापड-बुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने फिर्यादीच्या खिशातील पैसे काढून घेतले तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक ३८०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ११९(१), ३५२, ३५१(१)(२)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काचमांडे हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,059 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तोटंबा येथे अपघात होऊन मरण पावलेल्या तीन व्यक्तींच्या मृत्यूचा खरा जबाबदार कोण? गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा