अहमदपूर : -महाराष्ट्र स्टेट बॉल बॅडमिंटन असोसिएशनच्या अंतर्गत अमरावती येथे दि. ४ ते ६ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७० व्या सीनियर महाराष्ट्र स्टेट बॉल बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ साठी लातूर जिल्ह्याच्या पुरुष संघाची निवड चाचणी घेण्यात येणार आहे. ही निवड चाचणी बुधवार, दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता जिल्हा परिषद ग्राउंड, अहमदपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील बॉल बॅडमिंटन खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन लातूर जिल्हा बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष धनंजय कोत्तावार व सचिव असद शेख यांनी केले आहे. अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत लातूर जिल्ह्याचा संघ सहभागी होणार असून, त्यासाठी गुणवंत व पात्र खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अनुभवी तसेच नवोदित खेळाडूंना या निवड चाचणीच्या माध्यमातून राज्यस्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व बॉल बॅडमिंटन खेळाडूंनी निर्धारित वेळेत जिल्हा परिषद ग्राउंड, अहमदपूर येथे उपस्थित राहून निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 506 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आदिवासी विद्यार्थ्यांकडे सहाव्या दिवसापर्यंत सुध्दा प्रशासनाचा कानाडोळा परभणीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक!