नांदेड(प्रतिनिधी)-आदिवासी विद्यार्थी समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाचा आज 6 वा दिवस असतांना सुध्दा कोणत्याही अधिकाऱ्याने त्यांची दखल घेतलेली नाही. विद्यार्थ्यांनी सांगितले की, राज्यस्थरावरील मागण्या मान्य झाल्या आहेत. परंतू स्थानिक पातळीवर कोणीही त्यांची दखल घ्यायला तयार नाही. आज आदिवासी विद्यार्थ्यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींसाठी राज्यभर 490 वस्तीगृह कार्यरत आहेत. परंतू त्यासाठी तयार करण्यात आलेली नियमावली ही अत्यंत अडचणीची आहे. म्हणूनच आम्ही 14 ऑगस्ट 2026 च्या राजपत्रात बदलाची मागणी करत आहोत. याशिवाय एसटी आरक्षणामधील बिंदु नामावली क्रमांक 8 मध्ये अनुसूचित जमातीची नावे असावीत. किनवट जात पडताळणी कार्यालय जे छत्रपती संभाजीनगर येथे आहे ते किनवट येथे स्थलांतरीत करण्यात यावे. अटी टाकून जात पडताळणी प्रमाण देण्यात येवू नये. सरळ सेवेत रखडलेली 12520 पदांची तात्काळ भरती करावी. पेसा भरतीतील कर्मचाऱ्यांना तात्काळ कायमस्वरुपी नियुक्ती देण्यात यावी. वस्तीगृह प्रवेशातील विद्यार्थ्यांना डीबीटी देण्यात यावे. त्यासाठी पंडीत दिनदयाल उपाध्यय स्वयंम योजना प्रमाणे सुधार करता येवू शकतो. परिक्षापुर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांला तिन दिवस वस्तीगृहात राहता यावे अशी त्यांची मागणी आहे. महाविद्यालयातील कनिष्ठ स्तर येथे गणवेश असेल तर त्यासाठी प्रति विद्यार्थ्याला 2 हजार रुपये देण्यात यावे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी शिकवणी या वेळेस (अप्रेर्मंटसाठी) 1500 रुपये वाढ करण्यात यावी. शासकीय वस्तीगृहातील लॅब्रेनसाठी 1500 रुपये प्रति विद्यार्थी वाढ करण्यात यावी. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला 5 हजार रुपये देण्यात यावे. महाराष्ट्रातील प्रत्येक मध्यवर्ती ठिकाणी आदिवासी मुला-मुलींसाठी 1200 विद्यार्थी क्षमतेचे स्वतंत्र वस्तीगृह उभारण्यात यावे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वाचनालय, अभ्यासिका आणि विद्यार्थी समन्वय केंद्र सुरू करण्यात यावे. गढचिरोली येथील आश्रम शाळेत मरण पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपये देण्यात यावे. सोबतच संंबंधीत प्रशासकीय व राजकीय व्यक्त्ीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. राज्यातील प्रत्येक आदिवसी वस्तीगृहातील आणि आश्रम शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा 1 कोटी रुपयांचा विमा घेण्यात यावा असे निवेदन या आदिवसी विद्यार्थ्यांनी 25 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांना दिले आहे आणि ते उपोषण बसलेले आहेत. या निवेदनावर विलास ढोले आणि मंथन वाळके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. उपोषणास विद्यार्थीनींची संख्या मोठ्या संखेत आहे. आज सहावा दिवस असतांना सुध्दा स्थानिक पातळीवर कोणत्याही अधिकाऱ्याने त्यांची दखल घेतलेले नाही. नांदेड येथे असलेल्या वस्तीगृहाबद्दल विद्यार्थी सांगत होते की, आसना पुलाच्या पलीकडे साडेचार एकर जमीन असतांना त्यावर दोन इमारती उभ्या आहेत आणि त्यात फक्त 75 विद्यार्थ्यांना राहता येते एवढी क्षमता आहे. ती अपूर्ण आहे. तेथून बस प्रवासासाठी येण्याचा मार्ग नाही आणि आलोच तर अनेक प्रकारचे त्रास आहेत. याकडे सुध्दा शासनाने लक्ष द्वायला हवे. मागे एकदा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी या विद्यार्थ्यांसाठी शहरात दुसरी जागबा किरायाणे घ्या आणि त्यांची सोय करा असे सांगितले होते. परंतू ती सोय अद्याप झालेली नाही. —- Kanthak Suryatal Post Views: 833 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गुजरात लॉबीमध्ये उभी फूट? अमित शाह यांना बाजूला सारून मोदींनी मैदानात उतरवले दोन नवे चेहरे! लातूर जिल्हा पुरुष बॉल बॅडमिंटन संघाची २ सप्टेंबरला निवड चाचणी