नांदेड (प्रतिनिधी) – जुन्या वादातून खंजराने वार करून इंदरजितसिंग बावरी यांची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तपासाची गती वाढवली असून, या प्रकरणात आतापर्यंत सहावाआरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. यामध्ये चार प्रौढ आरोपी, एक विधिसंघर्षग्रस्त बालक आणि नव्याने अटक करण्यात आलेल्या अजय उर्फ अज्जू महेंद्र बिघानिया (२७) याचा समावेश आहे.आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मंगेश कायस्थ यांनी त्यास १६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.
पोलिसांनी यापूर्वी दिलीप पुंडलिक डाकोरे (३३), कृष्णा दिगंबर बारोळे (२९), रणजीत ऊर्फ रंज्या चांदू सूर्यवंशी (२३), ज्योती जगदिश बिगानिया (४०) तसेच एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. हे चार प्रौढ आरोपी कालपासून १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.
दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांनी आज या प्रकरणातील क्रमांक ६ चा आरोपी अजय उर्फ अज्जू महेंद्र बिघानिया (२७) याला अटक केली. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मंगेश कायस्थ यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अजय बिघानिया याला १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही धक्कादायक घटना ८ ऑगस्ट रोजी घडली होती. संत गाडगेबाबा सोसायटी, जुना कौठा येथील रहिवासी इंदरजितसिंग बावरी हे त्यांच्या चुलत भावासोबत फायनान्सच्या कामानिमित्त धनेगाव येथील पेट्रोल पंपावर गेले होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी जुन्या वादाचा सूड घेण्याच्या उद्देशाने इंदरजितसिंग यांच्यावर खंजराने वार केले.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इंदरजितसिंग बावरी यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू करून संशयित आरोपींचा शोध घेतला. आतापर्यंत सहा जण पोलिसांच्या कारवाईच्या कक्षेत आले असून, हत्येमागील नेमका कट, आरोपींची भूमिका आणि वापरण्यात आलेल्या शस्त्राबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.या प्रकरणात एफआयआर मध्ये नाव असलेला नितीन बिघानिया अद्याप इतके पासून दूर आहे.कैलास बिघानियाचे नाव सुद्धा या गुन्ह्यात आहे.पण तो पूर्वीपासूनच तुरुंगात आहे.
मरण पावलेला युवक इंदरजितसिंग बावरी ..

